स्वरयोगिनी हरपल्या, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन

पुणे : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. प्रभा अत्रे यांना आज पहाटे झोपेतच ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचे निधन झाले होते. अत्रे यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार केले जातील. दोनच वर्षांपूर्वी कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

दुर्दैवी गोष्ट म्हणजे आज मुंबईत त्यांचा कार्यक्रम ठरला होता. यासाठी त्या मुंबईला येणार होत्या, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. उस्ताद राशिद खान यांच्या निधनाच्या वृत्तातून संगीत विश्व सावरत असतानाच आणखी एक धक्का बसला.

एका व्यक्तीसाठी देवासोबत खेळ, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावरुन काँग्रेसची मोदींवर टीका
स्वरयोगिनी, संगीत विचारवंत , लेखिका अशी बहुआयामी ओळख असलेल्या डॉ. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या बुजुर्ग गायिका होत्या. त्या पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या होत्या. केंद्र सरकारने त्यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल १९९० मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. २०२२ मध्ये पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. अत्रे यांना संगीत नाटक अकादमी तसेच पुण्यभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अत्रे यांची संगीतावरील अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

राम मंदिर आंदोलनात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या अडवाणींचे वक्तव्य, म्हणाले नियतीकडूनच मोदींची…..
प्रभा अत्रे या शास्त्रीय गायन विश्वातील अव्वल कलाकारांपैकी एक होत्या. भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात प्रभा अत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रभा अत्रे यांचे संगीताच्या विविध शैलींवर प्रभुत्व होते. ख्याल, ठुमरी, दादरा, गझल यासारख्या विविध गायन प्रकारांत त्यांचे नैपुण्य होते.

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

dr prabha atredr prabha atre deathheart attackPune newsज्येष्ठ शास्त्रीय गायिका निधनडॉ. प्रभा अत्रेपुणे बातम्याप्रभा अत्रे निधन
Comments (0)
Add Comment