Honor X9b इंडिया लाँच कंफर्म
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ऑनरचे हेड माधव सेठ यांनी नवीन मोबाइल Honor X9b चा लाँच कंफर्म केला आहे. पोस्टमध्ये पाहू शकता फोनचा व्हिडीओ शेयर केला गेला आहे. हा काही दिवसांपूर्वी चीनमध्ये लाँच करण्यात आलेला Honor X9b आहे. आशा आहे की लवकरच स्मार्टफोनची लाँच डेट देखील समोर येऊ शकते. हा फोन मिड रेंजमध्ये दमदार फीचर्ससह युजर्सना शानदार एक्सपीरियंस देऊ शकतो.
HONOR X9b चे स्पेसिफिकेशन्स
HONOR X9b मध्ये ६.७८ इंचाचा कर्व OLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि १.५के रिजॉल्यूशनला सपोर्ट करतो.
परफॉरमेंससाठी स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६ जेन १ चिपसेटचा वापर करण्यात आला. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी एड्रिनो ७१० जीपीयू आहे.
डिव्हाइसमध्ये १२जीबी पर्यंत रॅम आणि २५६जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते.
कॅमेरा फीचर्स पाहता HONOR X9b ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह आला आहे. ज्यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे झाला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. HONOR X9b ५,८०० एमएएच बॅटरी आणि ३५वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम ५जी, ४जी, वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.१ जीपीएस, सुरक्षेसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखे अनेक फीचर्स मिळतात. ऑपरेटिंग सिस्टम पाहता HONOR X9b अँड्रॉइड १३ आधारित मॅजिक युआय ७.२ वर चालतो.