भारतीय क्रीडा प्राधिकरण येथे मोठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

Sports Authority of India Recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक, उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक या पदांच्या एकूण २१४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून १५ जानेवारी २०२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर ३० जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
सहाय्यक प्रशिक्षक – ११७ जागा
प्रशिक्षक – ४३ जागा
वरिष्ठ प्रशिक्षक – ४५ जागा
उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक – ०९ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २१४ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

वयोमर्यादा –
सहाय्यक प्रशिक्षक – कमाल वय ४० वर्षे
प्रशिक्षक – कमाल वय ४५ वर्षे
वरिष्ठ प्रशिक्षक – कमाल वय ५० वर्षे
उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक – कमाल वय ६० वर्षे

वेतन –
सहाय्यक प्रशिक्षक – ५० हजार
प्रशिक्षक – ०१ लाख ०५ हजार
वरिष्ठ प्रशिक्षक – ०१ लाख २५ हजार
उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक – ०२ लाख २० हजार

भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘भारतीय क्रीडा प्राधिकरण’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ३० जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.

Source link

recruitmentSAI Bharti 2024SAI Recruitment 2024Sports Authority Of India RecruitmentSports Authority Of India Recruitment 2024भारतीय क्रीडा प्राधिकरण नोकरी
Comments (0)
Add Comment