उदय सामंत काय म्हणाले?
मिलिंद देवरा पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याची चर्चा मीही ऐकली. मिलिंद देवरा यांना मी जितकं ओळखतो, त्यानुसार ते लोकांमध्ये जाऊन काम करणारे मुंबईतील नेतृत्व आहे. मिलिंद देवरा यांच्या नावाला आणि कामाला वेगळं वलय आहे. एकनाथ शिंदे ज्याप्रमाणे लोकांसाठी अहोरात्र मेहनत करतात, अशा नेत्याला जर मिलिंद देवरा यांच्यासारख्या नेत्याची साथ मिळाली, तर मुंबईत अतिशय मोठ्या पद्धतीने शिवसेना वाढेल, असं माझं प्रामाणिक मत आहे, असं उदय सामंत म्हणाले.
मीही आवाहन करतो, की जर मिलिंद देवरा यांच्या मनात पक्षात (शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना) येण्याचे विचार चालू असतील, तर त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारुन, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा, असंही उदय सामंत म्हणाले.
दरम्यान, मिलिंद देवरा यांचा कोणताही निर्णय झालेला नाही, ही विरोधकांनी उठवलेली अफवा आहे, यात काहीही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या – आमदार प्रणिती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. ठाकरेंच्या नेतृत्वात विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी तिसऱ्यांदा या जागेवरुन निवडणूक लढवून जिंकावं, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. तर देवरा कुटुंबाचं वर्चस्व राहिलेल्या या मतदारसंघावर काँग्रेसचाही डोळा आहे. मिलिंद देवरा या जागेसाठी आग्रही असून त्यावरुन दोन पक्षात बेबनाव झाल्याचं बोललं जात आहे.
Read Latest Maharashtra Updates And Marathi News