मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा शेजराव (वय २९, रा. माऊली नगर परभणी) हिचा विवाह दिनेश सईजराव यांच्याशी रीतीरीवाजाप्रमाणे २०१८ सली संपन्न झाला. त्यानंतर मे २०१९ दोघांना दीप्ती नावाची मुलगी झाली. पण पती दिनेश सह सासरच्या सर्वांनाच मुलगा हवा होता. बाळंतपणानंतर शिल्पा जेव्हा आपल्या मुलीला घेऊन सासरी आली तेव्हा सासरच्यांनी ”तू कशाला आलीस. मुलीला जन्म देऊन आमच्या घरी का आलीस”, म्हणून शिव्या द्यायला सुरुवात केली. तर पती दिनेशने मारहाण देखील केली. शारीरिक व मानसिक त्रास सहन करत शिल्पा मात्र सासरीच राहिली.
घरातील नणंद सासू या शिल्पाला शिव्या देऊ लागल्या, जीवे मारण्याची धमकी देखील देऊ लागल्या. त्यानंतर शिल्पाला ”माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, पैसे नाही दिल्यास तुला आम्ही नांदवणार नाही”, असा तगादा सुरू केला. ”तुला स्वयंपाक येत नाही. तू दिसायला चांगली नाहीस. आम्ही आमच्या दिनेश चे दुसरे लग्न लावून देणार आहोत”, असेही त्या म्हणू लागले. सासरचे सर्वजण शिल्पाला त्रास देऊ लागले.
शिल्पाने सर्व प्रकार माहेरी आपल्या आईला आणि भावाला सांगितला. भाऊ गजानन मोरे यांनी आपल्या बहिणीला मे २०२२ मध्ये माहेरी घेऊन आला. पण माहेरी आल्यानंतर ही शिल्पाचा त्रास काही कमी झाला नाही. शिल्पाची सासू आशाबाई या शिल्पाच्या माहेरी आल्या आणि शिल्पा व तिच्या आईला शिवीगाळ करून मारहाण केली तसेच ”तू माहेरी राहतेसच कशी? तुला नांदायचे नाही का? आम्ही सांगितलेले दोन लाख रुपये जमा झाले का नाही? याद राख जर तू दोन लाख रुपये घेऊन सासरी आली नाहीस. तर तुला आम्ही खतम करू”, असे म्हणत मारहाण केली.
त्यामुळे शारीरिक मानसिक क्षणाला त्रासलेल्या शिल्पाने आपल्या आईसह पोलीस ठाणे गाठले आणि सासरच्या नवरा दिनेश सईजराव, सासरा विठ्ठल सईजराव, सासू आशाबाई, दीर युवराज सईजराव, ननंद वंदना धवसे, नणंद भरत धवसे यांच्याविरुद्ध परभणी येथील मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.