पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती; थेट मुलाखत पद्धतीने होणार निवड

Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अंतर्गत मोठी भरती सुरू आहे. या मध्ये फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ या पदांच्या एकूण ६५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पालिकेने नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. या मुलाखती जाहिरात/ अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून म्हणजेच १२ जानेवारी २०२४ पासून दर बुधवारी होणार आहेत. तेव्हा या भरती बाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
फिजिशियन – ०९ जागा
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – ०९ जागा
बालरोग तज्ञ – ०९ जागा
नेत्ररोग तज्ञ – ०९ जागा
त्वचारोग तज्ञ – ०९ जागा
मानसोपचार तज्ञ – १० जागा
ईएनटी तज्ञ – १० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ६५ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवार संबधित विषयात एमडी/ एमएस/ डीएनबी असावा. यासंदर्भात विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

नोकरी ठिकाण –
पिंपरी चिंचवड

निवड प्रक्रिया –
मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- ४११ ०१८

मुलाखतीची तारीख
– आठवडयातील दर बुधवारी / सकाळी ११ वाजता

भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुलाखत प्रक्रिया – या भरती करिता थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. मुलाखतीला येण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तसेच मुलाखतीला येताना जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी.

Source link

PCMC Bharti 2024PCMC Recruitment 2024Pimpri Chinchwad Municipal Corporation jobsrecruitmentपिंपरी-चिंचवड महानगरपालिकापिंपरी-चिंचवड महापालिका
Comments (0)
Add Comment