मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ पदावर भरती सुरु; २३ जानेवारी ऑनलाइन अर्जाचा शेवटचा दिवस

Bombay High Court Recruitment 2023 : मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत जिल्हा न्यायाधीश पदांच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२४ आहे. अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर जाऊन त्यांचा अर्ज भरू शकतात.

पदभरतीचा तपशील :

संस्था : मुंबई उच्च न्यायालय
भरले जाणारे पद : जिल्हा न्यायाधीश
पद संख्या : १९ पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ जानेवारी २०२४
नोकरीचे ठिकाण : मुंबई
वय मर्यादा : ३५ ते ४८ वर्षे

मिळणार एवढा पगार :

पात्रतेप्रमाणे, निवड झाल्यानंतर,उमेदवारांना १,४४,८०० ते १,९४,६६० रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

उच्च न्यायालयातील भरतीसाठी असा करा अर्ज :

1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध
महत्वाच्या लिंक्स :
उच्च न्यायालयातील भरतीविषयी अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

उच्च न्यायालयातील भरतीमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

bhc recruitment 2023bhc recruitment 2023 apply onlineBombay high courtbombay high court apply onlinebombay high court recruitmentbombay high court recruitment 2023bombay high court recruitment 2024bombay high court stenographer recruitment 2023मुंबई उच्च न्यायालय नोकरी
Comments (0)
Add Comment