प्रथम महिला अधिकारी स.पो.नि नीता कायटे यांनी पो.स्टे.ला राबविला स्तुत्य उपक्रम…!

(एरंडोल ता.प्रतिनिधी:शैलेश पांडे)

एरंडोल:तालुक्यातील कासोदा पो.स्टे. येथे या महिन्यातच नूतन व पहिल्या महिला अधिकारी म्हणून आलेल्या सपोनि.नीता कायटे मॅडम यांनी आज दि.५ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून पो.स्टे.ला राबविला स्तुत्य उपक्रम…!

याबाबत सविस्तर वृत्त असे..

संपूर्ण भारतात दि. ५ सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिना निमित्त शिक्षक दिवस साजरा होत असतो .
याचेच औचित्य साधुन कासोदा पोलीस स्टेशनच्या नवनियुक्त व कर्तव्यदक्ष युवा सपोनि. निता कायटे यांनी कासोदा सह परिसरातील मुख्याध्यापक व शिक्षकांचा शिक्षकदिनी सत्कार केला .

याकार्यक्रमाचे प्रास्तावीक व सुत्रसंचलन भारती विद्यामंदीर चे राजेंद्र ठाकरे सर यांनी केले .

प्रथमतः डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन आडगाव हायस्कूल चे मुख्यध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर व साधना माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पी.डी.रंवदळे यांच्या हस्ते करण्यात आले .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निता कायटे होत्या . सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने प्रमोद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,प्रथम शिक्षकांचा पोलीस स्टेशन मार्फत सत्कार होत आहे.शिक्षक नेहमीच पोलीस स्टेशन पासून लांब असतो .परंतू निता मॅडम यांनी पोलीस स्टेशन मधे शिक्षकांचा सत्कार केला हाच आमचा सर्वात मोठा बहुमान समजतो . यावेळी पोलीस अधिकारी निता यांनी सांगितले की , कोणताही उच्चपदस्थ अधिकारी नेता असो व शास्त्रज्ञ हा शिक्षकांमुळेच घडत असतो . शिक्षक हाच मोठा शिलेदार समाजात पिढी घडविण्याचे कार्य करतो . यावेळी कासोदा आडगाव सह सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक बांधव उपस्थित होते . अग्लो उर्दूच्या शिक्षक असोशियन वतीने निता मॅडम यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी क.नं. मंत्री विद्यालयाचे मुख्याध्यापक बोरसे सर भारती विद्यामंदीरच्या मुख्याध्यापिका सौ वंदना चौधरी, नांदखुर्दे जि.प.चे मुख्याध्यापक भगवान गढरी ;बांभोरीचे मुख्याध्यापक पांडुरंग चौधरी , नाना चौधरी, दिपक बावस्कर सर , चौधरी सर , वाणी सर , पी डी रंवदळेसर, मुख्तार सर, अजीज सर, नासिर सर ,महेमिल सर, अन्वर सर ,आसिफ सर, इंमरनसर शोयएब सर,आदि पस्तीस ते चाळीस शिक्षक बांधव व पोलीस कर्मचारी उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या शेवटी पीएसआय नरेश ठाकरे यांनी मानले

Comments (0)
Add Comment