शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांची कारवाई, आणखी तिघांना अटक; मोठी माहिती समोर येणार?

पुणे : शरद मोहोळ खुनाच्या कटात सहभागी असलेल्या आणि पिस्तुलखरेदीसाठी आर्थिक मदत करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली. आदित्य गोळे (वय २४), नितीन खैरे आणि अन्य एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

पाच जानेवारीला सुतारदरा येथे राहत्या घराजवळ मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. पोळेकर आणि आणखी दोघांनी मोहोळवर गोळ्या झाडल्या होत्या. मोहोळचा खून करण्यासाठी आरोपींनी एक महिन्यापूर्वी कट रचला होता. त्यासाठी आरोपींनी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी आरोपी खैरे हा मुन्ना पोळेकरसोबत तेथे हजर होता.

Dr Prabha Atre Death : स्वरयोगिनी हरपल्या, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन
या प्रकरणात पैशाची संपूर्ण व्यवस्था खैरे याने केली होती. गोळे यांनी बंदुकीसाठी पैसे पुरवले होते. मोहोळचा खून करण्यासाठी रचण्यात आलेल्या कटात तो सहभागी होता. तिसरा आरोपी फोनद्वारे आरोपींच्या संपर्कात होता. तसेच, तो ही या संपूर्ण कटात तो सहभागी होता.

दरम्यान, खून करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना गुन्हे शाखेने पाठलाग करून अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपींमध्ये दोन वकिलांचाही सहभाग आहे.

नमो महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी नारी शक्तीची पायपीट, उन्हाचा त्रास, जेवणाचीही गैरसोय

Source link

Pune Policesharad mohol murder casesharad mohol murder three arrestedsharad mohol murder updatesपुणे पोलीसशरद मोहोळ हत्या अपडेट्सशरद मोहोळ हत्या तिघांना अटकशरद मोहोळ हत्या प्रकरण
Comments (0)
Add Comment