कृषीदूत हर्षवर्धन पाटील, आनंद परदेशी, हितेंद्र राजपूत, अनिकेत पाटील आणि नितिन काटे यांचे सरपंच देवानंद बहारे, उपसरपंच शिवाजी पारधी, ग्रामविकास अधिकारी शेखर धनगर व इतर ग्रामस्थांनी स्वागत केले.
कृषि पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण कृषि जागरुकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव योजना हा प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवणार आहे. या दरम्यान विदयार्थी प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन प्रथम सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, शेतकऱ्याचे जीवनमान, यांचा सामाजिक आर्थिक स्तर, साक्षरतेचे प्रमाण संबंधीत गावातील पीक पद्धती, नैसर्गिक संसाधने, अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. तसेच माती परिक्षण, पाणी व्यवस्थापन, विविध पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन, हवामान सल्ला, बाजारभाव व आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली जाणार आहे. कृषि औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शेवटच्या चार आठवड्यामध्ये विदयार्थी कृषि आधारित व्यवसाय किंवा उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतील.
या कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सी. डी. देवकर,डाॅ. जे. एच. गायकवाड, डॉ. पी. डी. सोनवणे, डॉ. जी. बी. काबरे, डॉ. आर. जे. देसले, डॉ.एस.एच.बन, डॉ. विक्रांत भालेराव, डॉ. व्ही. एस. गिरासे, डॉ. जे एम. पाटील, डॉ. संदीप पौळ, डाॅ. प्रकाश पवार, डॉ. विकास पवार, डॉ. प्रशांत पवार, डॉ. सुनील पाटील, डॉ. संदीप निकम, डॉ. पंकज देवरे, डाॅ. एस.सी.वाडिले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत दहिवद गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.