रामराया…. अखंड भारत व्हावा, काळाराम मंदिरात महापूजन करताना पंतप्रधान मोदींचे साकडे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक:‘भारत देशाला गतवैभव पुन: प्राप्त होवो. या देशातील बळीराजा सुखी-समृद्धी होऊन देश सुजलाम् सुफलाम् होवो. देशातील जनता सुखी व समृद्धी राहो आणि देशवासीयांचे अखंड भारताचे स्वप्न साकार होवो’, असा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री काळाराम मंदिरात महापूजन करताना सोडला, अशी माहिती आचार्य श्री महामंडलेश्वर सुधीरदास महंत यांनी दिली.

श्री काळाराम मंदिरात केवळ पूजाच नाही, तर भावार्थ रामायणाच्या व्यासपीठावर भजन आणि मंदिराच्या आवारात प्रत्यक्ष सफाई कामात सहभाग घेऊन पंतप्रधान मोदी यांनी मंदिर प्रदक्षिणा केली. यावेळी मंदिराच्या प्रांगणात सुरू असणाऱ्या सत्संग गादीवरही काही मिनिटे आसन साधून सत्संगाचाही लाभ घेतला. दरम्यान, गाभाऱ्यात श्री प्रभूरामचंद्रांचे पूजन झाल्यानंतर श्री काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने पंतप्रधानांना प्रभू रामांची चांदीची प्रतिमा, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी श्री काळाराम मंदिराचे आचार्य महामंडलेश्वर महंत सुधीरदास, विश्वस्त धनंजय पुजारी, नरेश पुजारी, मंगेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी आणि वारकरी-संत समूहातील मान्यवर उपस्थित होते.

श्री काळाराम मंदिराच्या पूर्व महाद्वारासमोर स्थित असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पंतप्रधानांनी अभिवादन केले.

संत एकनाथांच्या वंशजांचे विवेचन

श्री काळाराम मंदिराच्या आवारात आयोजित सत्संगात यावेळी पंतप्रधानांसमोर काही संतांचे अभंग आणि भावार्थ रामायणाच्या अध्यायातील काही श्लोकांचे विवेचन करण्यात आले. या श्लोकांमध्ये प्रभू रामचंद्रांच्या नाशिकमधील वास्तव्याचे संदर्भ आले आहेत. या संदर्भांवर यावेळी संत एकनाथ महाराज यांच्या वंशजांनी विवेचन केले.

तरुणांना पंतप्रधान मोदींचे ३ सल्ले

Source link

kalaram mandir nashikkalaram temple nashikNarendra Modinarendra modi nashikNashik newsPM Modiकाळाराम मंदिर नाशिकनाशिक न्यूजपंतप्रधान नरेंद्र मोदी
Comments (0)
Add Comment