भारतीय हवाई दलाच्या ‘सुखॉय ३० एमकेआय’चा थरार, अवघ्या तीन मिनिटांत पुणे-मुंबई अंतर कापले

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई:‘सुखोई ३० एमकेआय’ या विमानाने ताशी दोन हजार किलोमीटर वेगाने पुण्याच्या लोहगाव हवाई तळावरून अलिबागमार्गे तीन मिनिटांत मरीन ड्राइव्ह गाठून दक्षिण मुंबईतील आकाशात १० मिनिटे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. सुखोईसह प्रशिक्षणार्थी लढाऊ विमानांचा समावेश असलेले ‘सूर्यकिरण’ पथक, ‘सारंग’ हेलिकॉप्टर पथक यांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी मुंबईकरांनी एअर शोच्या पहिल्या दिवशी अलोट गर्दी केली.

हवाई दलाचा एअर शो शनिवारी दुपारी मरीन ड्राइव्ह परिसरात झाला. या एअर शोची सुरुवात हवाई दलाच्या कमांडोंच्या ‘आकाशगंगा’ पथकाने जवळपास १५ हजार फूट उंचीवरून ‘सी-१३० सुपर हर्क्युलस’ विमानातून पॅराशूटच्या साह्याने मारलेल्या उडीद्वारे झाली. उडी मारून ते गिरगाव चौपाटीवर उतरले. त्यानंतर प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली व त्याद्वारे उपस्थितांमध्ये एकच जल्लोष दिसला.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आजपासून; कोणत्या प्रमुख नेत्यांचा सहभाग? कसे असेल नियोजन?

सारंग’ या पथकात ‘एएलएच’ हेलिकॉप्टरचा समावेश आहे. अशी पाच हेलिकॉप्टर कुलाब्यातील ‘आयएनएस शिक्रा’ येथून हवेत झेपावली. ‘सूर्यकिरण’ पथकाचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन जी. एस. धिल्लो यांनी केले. ‘सारंग’ तुकडीचे नेतृत्व ग्रुप कॅप्टन एस. के. मिश्रा यांनी केले.

या एअर शोचा मुख्य कार्यक्रम आज, रविवारी रविवारी दुपारी ११.५५ ते १.१५ दरम्यान आहे. राज्यपाल रमेश बैस हे त्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

अविस्मरणीय- नरेंद्र मोदी स्टेडियमवर एअरफोर्सचा खास एअर शो

Source link

indian air forceIndian Armymumbai newssukhoi 30 mki airoplaneएअर शो मुंबईभारतीय हवाई दलमुंबई न्यूजसुखोई ३० एमकेआय विमान
Comments (0)
Add Comment