संक्रांतीमुळे भाज्या कडाडल्या, वांगी- गाजर- मटार या भाज्यांना मोठी मागणी, जाणून घ्या ताजे दर

म. टा. प्रतिनिधी, पुणे: भोगी आणि संक्रांतीसाठी लागणाऱ्या भाज्यांना मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाज्यांच्या खरेदीसाठी बाजारात शनिवारी आणि रविवारी गर्दी झाली होती. किरकोळ बाजारात पावशेर भाजीचे दर ३० ते ४० रुपयांदरम्यान आहेत. भोगीच्या मिश्र भाजीलाही मागणी वाढली आहे.

‘भोगीनिमित्त शनिवारी आणि रविवारी वाल पापडी, पापडी, मटार, वांगी, पावटा, गाजर, कांदापात, वांगी; तसेच पालेभाज्यांमध्ये मेथी, चुका, चाकवत आणि पालक या भाज्यांना मागणी होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाज्यांना मागणी वाढल्याने दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे,’ अशी माहिती किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी दिली.

शनिवारी मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजाराचे कामकाज बंद असते. त्यामुळे किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी भाज्यांची खरेदी केली. रविवारी मार्केट यार्ड सुरू झाल्यानंतरही मागणी कायम राहिल्याने भाज्यांचे दर तेजीत होते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. भोगीसाठी लागणाऱ्या भाज्यांच्या खरेदीसाठी मध्यभागातील महात्मा फुले मंडईसह, नेहरू चौक, गोविंद हलवाई चौक परिसर; तसेच उपनगरांतील लहान मंडई आणि आठवडी बाजारात गर्दी झाली होती. संक्रांतीनिमित्त पूजनासाठी लागणारे साहित्य; तसेच तिळगुळाला चांगली मागणी होती. पूजा साहित्यखरेदीसाठी मंडई, शनिपार परिसरात नागरिकांची गर्दी केली होती.

धक्कादायक! एकाच रात्री तब्बल दहा दुकाने फोडली; मोठी रोकड लांबवत चोरटे पसार, तपास सुरू
हरभरा गड्डीची आवक वाढली

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीची दीड लाख जुडी, मेथीची ५० हजार जुडी; तसेच २० ते २२ हजार हरभरा गड्डीची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आणि मेथीची आवक स्थिर राहिली. हरभरा गड्डीची आवक दहा हजार जुड्यांनी वाढली.


किरकोळ बाजारात भाज्यांचे दर (किलो)

हरभरा गड्डी ~ २५ ते ३० (एक गड्डी)

वालपापडी ~ १२० ते १४०

पापडी ~ १२० ते १४०

वांगी ~ १२० ते १४०

पावटा ~ १२० ते १४०

भुईमूग शेंग ~ १६० ते २००

मटार ~ ८० ते १००

गाजर ~ ५० ते ६०

कोकणातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कमाल, ओसाड जमिनीवर भाजीपाला लागवड

Source link

market yardpune market yard newsPune newspune vegetable pricesvegetable pricesपुणे न्यूजभाजीपाला दरभाजीपाला न्यूज
Comments (0)
Add Comment