…तर ते तालिबानी कसे?; शिवसेनेनं जावेद अख्तरांना फटकारले

हायलाइट्स:

  • जावेद अख्तर वादाच्या भोवऱ्यात
  • संघाबाबत केलेलं वक्तव्यामुळं वाद
  • शिवसेनेनं जावेद अख्तर यांना फटकारलं

मुंबईः ‘जावेद अख्तर (Javed Akhtar)हे त्यांच्या सडेतोड वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. या देशातील धर्मांधता, मुस्लिम समाजातील अतिरेकी विचार, राष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून फटकून वागण्याचे धोरण यावर जावेद यांनी कठोर प्रहार केले आहेत. धर्मांधांची पर्वा न करता त्यांनी ‘वंदे मातरम्’ चे गान केले आहे. तरीही संघाची तालिबानशी केलेली तुलना आम्हाला मान्य नाही,’ अशा शब्दांत शिवसेनेनं (Shivsena) ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्यावर निशाणा साधला आहे.

जावेद अख्तर यांनी आरएसएसवर केलेल्या टीकेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. भाजप नेत्यांनी जावेद अख्तर यांच्यावर कडवट शब्दांत टीकाही केली होती. या प्रकरणात आता शिवसेनेनंही उडी घेतली आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं जावेद अख्तर यांना फटकारले आहे. अख्तर यांनी तालिबानशी केलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ही चुकीची असल्याचं मत शिवसेनेनं व्यक्त केलं आहे.

‘तालिबानचे हे कृत्य रानटी असून ते निंदनीय आहे. त्याप्रमाणे आरएसएस, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीची आहे, या विचारधारेचे समर्थन करणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,’ असे मत ज्येष्ठ कवी लेखक जावेद अख्तर यांनी मांडले आहे व त्याबद्दल काही लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. संघ आणि तालिबानसारख्या संघटनांच्या ध्येयामध्ये कोणताही फरक नसल्याचे त्यांचे म्हणणे सर्वस्वी चूक आहे. संघाची भूमिका व त्यांच्या विचारांशी मतभेद असू शकतात आणि हे मतभेद जावेद अख्तर वारंवार मांडत असतात. त्यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष आहे म्हणून ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेस पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल?,’ असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजेंवर पलटवार; मतदारसंघात जाऊन दिलं आव्हान

‘अफगाणिस्तानात निर्घृण तालिबान्यांनी जो रक्तपात, हिंसाचार घडविला आहे व मनुष्यजातीचे पतन चालविले आहे, ते काळजाचा थरकाप उडविणारे आहे. तालिबान्यांच्या भीतीने लाखो लोकांनी देश सोडला आहे, महिलांवर अत्याचार सुरू आहेत. अफगाणिस्तानचा नरक बनला आहे. तालिबान्यांना तेथे फक्त धर्माचे म्हणजे शरीयतचेच राज्य आणायचे आहे. आपल्या देशाला हिंदू राष्ट्र बनवू पाहणारे जे जे लोक व संघटना आहेत, त्यांची हिंदू राष्ट्रनिर्मितीची कल्पना मवाळ आहे. धर्माच्या आधारावर पाकिस्तान व हिंदुस्थान ही दोन राष्ट्रे बनल्यावर हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात सातत्याने डावलले जाऊ नये, हिंदुत्व म्हणजे एक संस्कृती असून त्यावर आक्रमण करणाऱ्यांना रोखण्याचे हक्क ते मागत आहेत. अयोध्येत बाबरी पाडण्यात आली व तेथे राममंदिर उभे राहत आहे, पण आजही बाबरीसाठी जे आंदोलन करीत आहेत त्यांचा बंदोबस्त करा व तो कायद्याने करा, असे कोणी म्हणत असतील तर ते तालिबानी कसे?,’ असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

‘हिंदुस्थानात हिंदुत्ववादी विचार हा पूर्वापार आहे. कारण रामायण, महाभारत हा हिंदुत्वाचा आधार आहे. परकीय आक्रमकांनी हिंदू संस्कृतीवर तलवारीच्या बळावर आक्रमण केले, ब्रिटिश काळात धर्मांतरे झाली. त्या सगळय़ांविरुद्ध हिंदू समाज लढत राहिला, पण तो तालिबानी कधीच झाला नाही. हिंदूंची मंदिरे तोडली गेली, जबरदस्तीने धर्मांतरे घडविली गेली, पण हिंदू समाजाने संयम सोडला नाही. याच अतिसंयमाचा हा समाज बळी पडत राहिला आहे,’ अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

वाचाः …म्हणून जयंत पाटलांनी व्यक्त केली दिलगिरी

‘युरोपियन राष्ट्रे ख्रिश्चन, तर बाकी सर्व राष्ट्रे ‘इस्लामिक रिपब्लिक’ म्हणून आपापल्या धर्माची शेखी मिरवीत आहेत; पण जगाच्या पाठीवर एक तरी हिंदू राष्ट्र आहे काय? हिंदुस्थानात बहुसंख्य हिंदू असूनही ते राष्ट्र आज धर्मनिरपेक्षतेचाच झेंडा फडकवून उभे आहे. बहुसंख्य हिंदूंना सतत डावलले जाऊ नये हीच एक माफक अपेक्षा त्यांची आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Source link

javed akhtar and rssjaved akhtar news updatejaved akhtar’s talibanrss commentShivsenaआरएसएसशिवसेना
Comments (0)
Add Comment