बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात दहावी पास उमेदवारांसाठी भरती; आजच करा अर्ज

Krishi Vigyan Kendra Baramati Recruitment 2024: कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जिल्हा पुणे यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘कुशल सहाय्यक कर्मचारी’ पदाची रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

नुकतीच याबाबत कृषी विद्यान केंद्राने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून ११ फेब्रुवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पात्रता आणि वेतन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कृषी विज्ञान केंद्र, बारामती भरती २०२४ मधील पदे आणि पदसंख्या –
कुशल सहाय्यक कर्मचारी – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार दहावी परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा.

वेतन –
१८ हजार (मासिक)

नोकरी ठिकाण – बारामती, पुणे

वयोमर्यादा – कमाल वय २५ वर्षे

अर्ज पद्धती
– ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता
– अध्यक्ष, कृषी विकास ट्रस्ट, शारदानगर, मालेगाव खुर्द, बारामती, जि. पुणे, पिन – ४१३११५, महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ फेब्रुवारी २०२४

भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘कृषी विज्ञान केंद्र, बारामती’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ११ फेब्रुवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.

Source link

Krishi Vigyan Kendra Baramati RecruitmentKrishi Vigyan Kendra pune RecruitmentKVK Baramati Bharti 2024KVK Baramati Recruitment 2024recruitmentकृषी विज्ञान केंद्र पुणे भरतीकृषी विज्ञान केंद्र बारामती भरती
Comments (0)
Add Comment