पुण्याच्या संचेती रुग्णालयात विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या सर्व तपशील

Sancheti Hospital Pune Recruitment 2024: संचेती हॉस्पिटल पुणे अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. याद्वारे प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, क्लिनिकल प्रशिक्षक या पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून २२ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

संचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२४ मधील पदे आणि पदसंख्या –
प्राध्यापक सह प्राचार्य – ०१ जागा
प्राध्यापक सह उपप्राचार्य – ०१ जागा
सहयोगी प्राध्यापक – ०१ जागा
सहायक प्राध्यापक – ०२ जागा
क्लिनिकल प्रशिक्षक – ०८ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १३ जागा

शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्यासाठी मूळ जाहिरात/ संकेतस्थळ पहावे. त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

नोकरी ठिकाण
– पुणे

अर्ज पद्धती – ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता
– संचालक, संचेती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, शिवाजी नगर, पुणे – ४११००५.

अर्ज करण्याची शेवटची तारीख
– २२ जानेवारी २०२४

भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘संचेती रुग्णालय, पुणे’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया –
या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २२ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.

Source link

Pune JobsrecruitmentSancheti Hospital Pune Bharti 2024Sancheti Hospital Pune Recruitment 2024पुणे भरती २०२४संचेती रुग्णालय पुणे भरतीसंचेती रुग्णालय भरती २०२४
Comments (0)
Add Comment