सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीची अधिसूचना जारी, अर्ज करायला एका महिन्याचा अवधी

CRPF Constable GD Notification 2024 : केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) ने स्पोर्ट्स कोटा अंतर्गत ‘गट क’ मधील १६९ कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीची अधिसूचनाही जारी करण्यात आली असून, अधिसूचनेनुसार अर्जाची प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार rect.crpf.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. १६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.

अधिकृत अधिसूचनेनुसार, स्पोर्ट्स कोटा अंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलात तात्पुरत्या आधारावर (स्थायी होण्याची शक्यता) गट “क” मधील अराजपत्रित आणि अ-मंत्रालयीन पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी . पात्र भारतीय नागरिकांकडून (पुरुष आणि महिला) अर्ज मागवले जात आहेत.

रिक्त जागांचा तपशील :

क्रीडा कोट्याअंतर्गत १६९ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम आयोजित केली जात आहे.

वयोमर्यादा :

या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार १५ फेब्रुवारी २०२४ रोजी १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावेत.

अर्ज शुल्काविषयी :

CRPF कॉन्स्टेबल GD पदासाठी अर्ज करणार्‍या अनारक्षित श्रेणी, इतर मागासवर्ग आणि EWS श्रेणीतील पुरुष उमेदवारांसाठी अर्जाची फी १०० रुपये आहे. त्याचबरोबर महिला, एससी आणि एसटी प्रवर्गासाठी अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे.

असा कारा अर्ज :

या पदासाठी अर्ज करणारे इच्छुक उमेदवार फक्त CRPF च्या भरती वेबसाइट recruitment.crpf.gov.in द्वारे अर्ज करू शकतात.

Source link

CRPFcrpf constable gd age limitcrpf constable gd application feescrpf constable gd bharti 2024crpf constable gd eligibility criteriacrpf constable gd notification 2024crpf constable gd recruitment 2024crpf constable gd registration 2024crpf constable gd vacancy detailcrpf recruitment 2024
Comments (0)
Add Comment