माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार, परिसरात खळबळ

विरार : माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या घरावर सोमवारी पहाटे गोळीबार केल्याची धक्कादायक घटना विरार येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मोबिन शेख (वय ४३) असे या घरावर गोळीबार झालेल्या आरटीआय कार्यकर्त्याचे नाव आहे. या प्रकरणी विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते असलेले मोबीन शेख आपल्या परिवारासह विरार येथील गोपचार पाडा आशियाना अपार्टमेंट येथे वास्तव्यास आहे. सोमवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास मोबीन यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी ठोठावला. मात्र यावेळी त्यांनी दरवाजा उघडला नाही. याच दरम्यान अज्ञातांनी अचानक त्यांच्या घराच्या खिडकीत गोळीबार केला. ही गोळी खिडकीतून भिंतीला लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेले नाही अथवा कोणीही जखमी झालेले नाही.

वाळू माफियांची मुजोरी, कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रांताधिकाऱ्यांच्या हत्येचा प्रयत्न; दगडफेक करत मारहाण
त्यानंतर तात्काळ शेख यांनी या घटनेची माहिती विरार पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

विठ्ठलाच्या पंढरीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार, कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याचा संशय
याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी शोधपथके तयार करण्यात आली आहेत. यापूर्वी देखील मोबीन शेख यांच्यावर अशाच प्रकारे जीवघेणा हल्ला झाल्याचे कळते. शेख यांच्या घरावर सोमवारी केलेला गोळीबार कोणी व का केला? याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Source link

firing at right to information activistright to information activist mobin shaikhvirar crimevirar crime newsमाहिती अधिकार कार्यकर्ताविरार क्राईम
Comments (0)
Add Comment