मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य, दीड वर्ष फरार असलेले PI आज पोलिसांना शरण, मराठ्यांची प्रचंड गर्दी

जळगाव: मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गेल्या दीड वर्षापासून फरार असलेले तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आज सोमवारी (दि. १५) सकाळी पोलिसांना शरण आले. दरम्यान, त्यांना न्यायालयात आणण्यात येणार असल्याने तेथे मराठा समाज बांधवांची गर्दी झाल्याने ऐनवेळी त्यांना न्यायाधीश केळकर यांच्या निवासस्थानी हजर करण्यात आले. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सुषमा अंधारे कल्याणमधून लोकसभा लढणार? कार्यकर्त्यांची मागणी, शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन?
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर औरंगाबाद हायकोर्टात जामीन अर्ज केला. तेथेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात होता. निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा सुमारे दीड वर्षांपासून अधिक काळापासून शोध सुरू असतानाही ते यंत्रणेला सापडत नव्हते.

पोलीस यंत्रणेवर यामुळे टिकेची झोडही उठली होती. मात्र, आज सोमवारी सकाळी किरणकुमार बकाले हे स्वतःहून पोलीस अधीक्षक कार्यालयात येत पोलिसांना शरण आले आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली. स्थानिक न्यायालयासह हायकोर्टाकडूनही दिलासा मिळाला नसल्याने बकालेंच्या पदरी निराशा पडली होती. तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाने त्यांच्याविरोधात स्टॅण्डींग वॉरंट काढत मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. अडचणी वाढत चाललेल्या पाहून बकाले हे सोमवारी पोलिसांपुढे हजर झाले.

रविकांत तुपकरांचा सरकारला अल्टीमेटम, विविध मागण्यांसाठी औसा तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला

निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर त्याबाबतची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राज्यातील मराठा समाजात आजही संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी बकाले पोलिसांना शरण आल्यानंतर त्यांना सोमवारी दुपारी न्यायालयात नेण्यात येणार असल्याचे प्रचंड पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी बकाले यांना न्या. केळकर यांच्या निवासस्थानी हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Source link

jalgaon newskiran kumar bakalekiran kumar bakale surrenderedmaratha reservation newsकिरणकुमार बकाले पोलिसांना शरणकिरणकुमार बकाले बातमीजळगाव बातमीमराठा आरक्षण बातमी
Comments (0)
Add Comment