कोरोना काळात पवार कुटुंबियांकडून वसुलीचा धंदा, सिरमकडून ४३५ कोटींचं कमिशन घेतलं : सोमय्या

पिंपरी : जेष्ठ नेते शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांनी स्थापन केलेल्या ‘न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीने गेल्या बारा वर्षात एकही पैशाचा व्यवसाय केला नाही. मात्र मार्च २०२१ मध्ये सिरम इन्स्टिट्यूटच्या खात्यातून ४३२ कोटी प्रतापराव पवार यांच्या कंपनीत आले. मात्र हे आलेले पैसे कमिशन टीआर तर नाही ना? याबाबत आपण दिल्लीत जाऊन अधिक माहिती घेणार आहे. कोरोना काळात पवार कुटुंबियांकडून वसुलीचा धंदा सुरू होता, असा गंभीर भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय. पैसे कसे ढापायाचे हे शरद पवार आणि त्यांचे कुटुंब जगाला शिकवू शकते, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

पिंपरी चिंचवड येथे किरीट सोमय्या पीएमआरडीए येथे कामानिमित्त आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पवार कुटुंबियांवर गंभीर आरोप केले. त्यांच्या या आरोपाला शरद पवार आणि कुटुंबीय काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सिरमकडून ४३२ कोटी प्रतापराव पवारांच्या खात्यात, सोमय्यांचा गंभीर आरोप

यावेळी किरीट सोमय्या यांनी सांगितले की, ‘न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीत आलेले ४३२ कोटी शरद पवार परिवारातील प्रतापराव पवार यांच्या कंपनीत आले आहेत. त्यातील ३०० कोटी रुपये प्रतापराव पवार यांनी त्यांच्या दुसऱ्या कंपनीत वळवले आहेत. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष द्यायचे मान्य केले आहे. ही वसुली बाहेर काढल्यानंतर पवार परिवाराने मला १०० कोटींचा दावा ठोकण्याची धमकी दिली. पण पवार परिवाराला सांगा ४३२ कोटींचा हिशेब द्या. ही वसुली आहे. या वसुलीचा जाब पवार परिवाराला द्यावा लागणार असल्याचे सोमय्या म्हणालेत. निगडी येथे त्यांनी पीएमआरडीए त्यांनी या संदर्भात रितसर अर्ज केला असून त्यांचा दिल्लीत जाऊन पाठ पुरावा करणार असल्याचे सोमय्या म्हणालेत.

कोविड काळातील ४३५ कोटीच्या वसुलीचा हिशेब द्या, किरीट सोमय्यांचा पवार कुटुंबावर गंभीर आरोप

Source link

bjp kirit somaiyaKirit Somaiyanew star infra structure pvt ltdprataprao pawarserum institute of indiaSharad Pawarकिरीट सोमय्याप्रतापराव पवारशरद पवार
Comments (0)
Add Comment