कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुणाने जीवन संपवलं, आई-वडिलांचा मन हेलावणारा आक्रोश

प्रियांका पाटील, अहमदनगर : जामखेड तालुक्यातील जातेगावमध्ये वैभव मारूती गायकवाड (वय २३ ) याने बेरोजगारी व कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जातेगाव येथील वैभव मारूती गायकवाड हा सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरी नाही म्हणून शेती करत होता. शेतीतही कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल असे उत्पन्न मिळत नाही. यामुळे कर्ज वाढत जातं. यामुळे अनेक तरुण नैराश्याच्या गर्तेत आहेत. यातच ते आपली जीवनयात्रा संपवत आहेत. यामधूनच वैभवने हा टोकाचा निर्णय घेतला.

वैभव हा कुटुंबातील कर्ता मुलगा होता. आई, वडील, एक भाऊ, बहिण व आजीच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्याच्यावर होती. घरी पाच एकर जमीन आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरेसे उत्पन्न मिळत नाही. जमिकर्जबाजारीपणाला कंटाळून तरुणाने जीवन संपवलं, आई-वडिलांचा मन हेलावणारा आक्रोश; नगरमधील हृदयद्रावक घटना

नीवर कर्जही होते.

लोकसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल पण…., शशी थरूर यांनी सांगितली वेगळीच शक्यता
सध्या मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. तरीही आरक्षण नाही. यामुळे नोकरी नाही. यातच अनेक तरुण नैराश्याच्या गर्तेत आहेत. वैभव आपल्या रूममध्ये गेला आणि नैराश्यामुळे घर बंद करून घरात गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश जानकर घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे शवविच्छेदनासाठी पाठवले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केले. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात जातेगावमध्ये वैभववर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दावोसला जाणाऱ्या शिष्टमंडळात खासगी व्यक्तींचा समावेश, आदित्य ठाकरे यांचा खळबळजनक आरोप

Source link

ahmadnagar youth suicideAhmednagar policefarmer youth suicideअहमदनगर तरुणाची आत्महत्याअहमदनगर पोलीसशेतकरी तरुण आत्महत्या
Comments (0)
Add Comment