हिंमत असेल तर…; राम कदमांचे जावेद अख्तर यांना खुलं आव्हान

हायलाइट्स:

  • जावेद अख्तर वादाच्या भोवऱ्यात
  • संघाबाबत केलेलं वक्तव्यामुळं वाद
  • भाजप आमदाराचं अख्तरांना खुलं आव्हान

मुंबईः जावेद अख्तर (javed akhtar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपनं जावेद अख्तर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनीही अख्तर यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनीही जावेद अख्तर यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

सामनाच्या अग्रलेखातून संघाची तालिबानशी केलेली तुलना आम्हाला मान्य नाही, असं म्हणत शिवसेनेनं जावेद अख्तर यांना फटकारले होते. यावरुन भाजप आमदार राम कदम यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका केली आहे तर, शिवसेनेवरही जोरदार निशाणा साधला आहे. ‘जिलेबीसारखी गोल गोल भाषा? एका ठिकाणी शिवसेना मान्य करते आहे की जावेद अख्तर यांनी चुकीचे विधान केले आहे. मग वाट कसली पाहताय? आम्ही तक्रार करुन २४ तास होऊनही त्यांना अटक का करत नाही? हिंमत असेल तर ठोका बेड्या? त्याच्या घरासमोर, राडा करण्यापासून कोणी रोखले तुम्हाला?,’ असा सवाल राम कदम यांनी शिवसेनेला केला आहे.

RSS ची तालिबानशी तुलना; जावेद अख्तर यांना नीतेश राणेंचं खुलं आव्हान

‘हिंमत असेल तर जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जावून तालिबान्यांना व्यवहार बघावा. त्यांना आपोआप त्यांची चूक समजेल. जावेद अख्तर यांनी माफी मागितली पाहिजे,’ अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.

पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन देत राऊतांचा भाजपवर निशाणा; म्हणाले…

शिवसेनेनं जावेद अख्तर यांच्याबद्दल काय म्हटलं आहे?

जावेद अख्तर हे त्यांच्या सडेतोड वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. या देशातील धर्मांधता, मुस्लिम समाजातील अतिरेकी विचार, राष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून फटकून वागण्याचे धोरण यावर जावेद यांनी कठोर प्रहार केले आहेत. धर्मांधांची पर्वा न करता त्यांनी ‘वंदे मातरम्’ चे गान केले आहे. तरीही संघाची तालिबानशी केलेली तुलना आम्हाला मान्य नाही, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

अनिल देशमुखांना लूकआऊट नोटीस; देवेंद्र फडणवीसांनी दिला ‘हा’ सल्ला

Source link

javed akhtar and rssjaved akhtar news updatejaved akhtar statementjaved akhtar’s talibanram kadamrss commentजावेद अख्तरराम कदम
Comments (0)
Add Comment