मुंबईकरांनो लक्ष द्या! ‘या’ भागात उद्या पाणीपुरवठा बंद, कोणत्या परिसराला फटका? वाचा लिस्ट

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : भायखळा नवानगर, डॉकयार्ड रोड येथील जुनी १,२०० मिमी व्यासाची जलवाहिनी बंद करून नवीन १,२०० मिमी व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी भंडारवाडा जलवाहिनीवर जलद्वार बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे कुलाबा, सँडहर्स्ट रोड, भायखळा परिसरात उद्या १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. तर जे. जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

असा होईल १८ जानेवारीला पाणीपुरवठा बंद

(कुलाबा ए विभाग)

नेव्हल डॉकयार्ड सप्लाय : सेंट जॉर्ज रुग्णालय, पी. डिमेलो रोड, रामगड झोपडपट्टी, आर. बी आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शनपासून रिगल सिनेमापर्यंत.

(भायखळा ई विभाग)

नेसबीट झोन : ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, कामाठीपुरा, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, आग्रीपाडा, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर रोड, सोफिया जुबेर मार्ग, भायखळा (पश्चिम) म्हातारपाखाडी रोड झोन : म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी रोड, नेसबीट रोड, ताडवाडी रेल्वे कुंपण ( पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ६.३० ते सकाळी ८.१५)

(सँडहर्स्ट रोड/बी विभाग)

बाबूला टँक झोन : मोहम्मद अली मार्ग, इब्राहिम रहिमत्तुला मार्ग, इमामवाडा मार्ग, इब्राहिम मर्चंट मार्ग, युसूफ मेहेर अली मार्ग.
बीड बायपासचे काम रखडले; स्थलांतरित जलवाहिनीची जोडणी, अन्य कामांच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा
असा असेल १७ जानेवारीला पाणीपुरवठा बंद

डॉकयार्ड रोड झोन : बॅ. नाथ पै मार्ग, डिलिमा स्ट्रीट, गनपावडर रोड, कासार गल्ली, लोहारखाता, कॉपरस्मिथ मार्ग.

हातीबाग मार्ग : हातीबाग, शेठ मोतिशहा लेन, डि. एन. सिंघ मार्ग जे. जे. रुग्णालय : कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन : मुंबई पोर्ट ट्रस्ट, दारुखाना

माऊंट मार्ग : रामभाऊ भोगले मार्ग, फेर बंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान, घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, भायखळा पूर्व, शेठ मोतिशहा लेन, टी. बी. कदम मार्ग, संत सावता मार्ग

डोंगरी ‘ए’ झोन : उमरखाडी, वालपाखाडी, रामचंद्र भट मार्ग, समताभाई नानजी मार्ग, शायदा मार्ग, नूरबाग आणि डॉ . महेश्वरी मार्ग

मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन : सर्व मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन, पी. डिमेलो मार्ग (पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ६.३० आणि रात्री ११.३० ते मध्यरात्री २

मध्य रेल्वे : रेल्वे यार्ड

वाडी बंदर : पी. डिमेलो रोड, नंदलाल जैन मार्ग, लीलाधर शाह मार्ग, दानाबंदर, संत तुकाराम मार्ग

Source link

jj hospital mumbaikulaba to bycullamumbai water issuemumbai water supplymumbai water supply cutwater supply cut off
Comments (0)
Add Comment