Vivo V30 आणि Vivo V30 Pro बीआयएस लिस्टिंग
Vivo V30 स्मार्टफोन BIS लिस्टिंगवर V2318 मॉडेल नंबरसह दिसला आहे. तर Vivo V30 Pro V2319 मॉडेल नंबरसह समोर आला आहे. या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही स्पेसिफिकेशन किंवा इतर माहिती मिळाली नाही. परंतु एक बाब कंफर्म झाली आहे की हे डिवाइस लवकरच भारतात देखील सादर होऊ शकतात.
Vivo V30 सीरीज टीजर (लीक)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर टिपस्टर पारस गुगलानीनं विवो व्ही३० सीरीजचा लाँच टीजर समोर आणला आहे. तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये पाहू शकता की विवो व्ही३० सीरीज समोर ‘कमिंग सून’ लिहिण्यात आलं आहे. टिपस्टरनं देखील पोस्टमध्ये लिहलं आहे की ही सीरीज लवकरच येऊ शकते. इमेज मध्ये फोनचा फ्रंट आणि बॅक पॅनल देखील दाखवण्यात आला आहे. ज्यात डिस्प्लेवर पंच होल डिजाइन दिसत आहे.
Vivo V30 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo V30 मध्ये ६.७८ इंचाचा कर्व्ड अॅमोलेड १.५के डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो १२६० x २८०० पिक्सल रिजॉल्यूशन आणि १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. परफॉर्मन्ससाठी ब्रँड डिव्हाइसमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ चिपसेट दिला जाऊ शकतो. Vivo V30 मध्ये १२जीबी पर्यंत एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि २५६जीबी पर्यंत यूएफएस २.२ इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.
फोटोग्राफीसाठी Vivo V30 मध्ये Aura एलईडी फ्लॅशलाइट फीचरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात ५० मेगापिक्सलची प्रायमरी, ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड आणि एक लेन्स मिळण्याची शक्यता आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५० मेगापिक्सलचा कॅमेरा ड्युअल एलईडी फ्लॅशसह मिळू शकतो.
Vivo V30 फोनमध्ये ५०००एमएएचची बॅटरी आणि ८०वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळेल. Vivo V30 सीरीजचे दोन्ही फोन अँड्रॉइड १४ आधारित फनटच ओएस १४ वर चालू शकतात. स्मार्टफोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक फीचर, ड्युअल सिम ५जी, वाय-फाय, ब्लूटूथ सारखे अनेक ऑप्शन दिले जाऊ शकतात.