…तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राजकीय पक्षांना आवाहन
  • येणारा काळ आव्हानात्मक, सहकार्य करा – मुख्यमंत्री
  • वर्षा निवासस्थानी पार पडली आपत्ती व्यवस्थापनाबाबतची बैठक

मुंबई: करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्षांना व जनतेला संयम व नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. ‘महाराष्ट्रासह संपूर्ण देश करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिकेत तिसऱ्या लाटेमुळं जनजीवन अस्ताव्यस्त केलंय. चीनही विळख्यात सापडलाय. केरळमध्ये रोज ३० हजार नवे रुग्ण समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे. तो सगळ्यांनी गांभीर्यानं घेतला नाही, तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल,’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

वाचा: बेळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा; महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा

गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्ष मंदिरं उघडण्याची व सण-उत्सव साजरा करण्याची मागणी करत आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर सध्याच्या परिस्थितीकडं लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांनी सर्वांनाच आवाहन केलं आहे. ‘करोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत आहे. मागील अनुभव लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांनी गर्दीचे कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करावेत. आपल्याला तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

वाचा: अहमदनगर हादरले; एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

‘हे उघडा, ते उघडा’ या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकानं नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. त्यामुळं सगळ्यांनीच शहाणपणानं वागून लोकांच्या जिवाचं रक्षण करायला हवं. सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका. येणारे दिवस आव्हानत्मक आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे. सरकार सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा निर्माण करील, पण त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करा, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

वाचा: RSS ची तालिबानशी तुलना करणाऱ्या जावेद अख्तर यांना नीतेश राणेंचं खुलं आव्हान

Source link

coronavirus third wavethird wave of coronaUddhav Thackeray appeals Political Partiesuddhav thackeray news todayuddhav thackeray on coronavirusउद्धव ठाकरेकरोना
Comments (0)
Add Comment