मुंबई: राष्ट्रवादीतील फुटीनंतर सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घेण्यासाठी सांगितले आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यानुसार आज विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेतली.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार, विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादीतील आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेतली. यावेळी अध्यक्षांनी कागदपत्रांची आदलाबदल केली. तसेच पुढील सुनावणी ही २० तारखेला घेणार असल्याचे स्पष्ट केले. २० जानेवारीला दोन्ही गटातील सदस्यांना फेरसाक्ष देण्यासाठी २० जानेवारीला बोलावण्यात आले आहे.

त्यानुसार २० जानेवारीनंतर आमदारांची नियमित फेरसाक्ष होणार आहे. ही सुनावणी २५ जानेवारी पर्यंत होणार आहे. त्यानुसार २५ जानेवारीनंतर दोन्ही गटाच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर अध्यक्ष आपला निर्णय राखून ठेवणार आहेत. तर ३१ जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष हे आपला निर्णय देण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या वकिलांनी दिली.