फ्री 5G बंद होणार! Jio आणि Airtel बंद करणार 4G प्लॅनमध्ये मिळणारा 5G डेटा

Jio आणि Airtel भारतीय टेलीकॉम या दोन दिग्गज कंपन्या आहेत. जिओ आणि एअरटेलनं सर्वप्रथम भारतात 5G रोलआउट करण्यास सुरुवात केली होती. सध्या या दोन्ही कंपन्या आपल्या 4G प्लॅन्समध्ये 5G सर्व्हिस मोफत देत आहेत. लवकरच हे बंद होऊ शकतं. ताज्या रिपोर्टनुसार लवकरच या दोन्ही टेलीकॉम कंपन्या आपले नवीन 5G प्लॅन घेऊन येत आहेत. कंपनीचे ये नवीन 5G प्लॅन ४जीच्या तुलनेत ५ ते १० टक्के महाग असू शकतात.

Economic Times च्या लेटेस्ट रिपोर्टमध्ये माहिती देण्यात आली आहे की Jio आणि Airtel युजर्सना लवकरच मोठा धक्का देणार आहे. आतापर्यंत जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना 4G च्या किंमतीत 5G सर्व्हिस मिळत होती, परंतु लवकरच हे बदलणार आहे. या दोन्ही कंपन्या 4G प्लॅनमध्ये मोफत अनलिमिटेड 5G ची सुविधा बंद करू शकतात. रिपोर्टनुसार, जिओ आणि एअरटेल दोन्ही 5G साठी वेगळे नवीन प्लॅन लाँच करण्याची तयारी करत आहेत. हे प्लॅन्स २०२४ च्या उत्तरार्धात सादर केले जाऊ शकतात.

या नवीन प्लॅन्सची किंमत 4G च्या तुलनेत ५ ते १० टक्के जास्त असू शकते. बोलले जात आहे एअरटेल आणि जिओचे नवीन 5G प्लॅन मधील ४जी प्लॅन्सच्या तुलनेत ३० टक्के जास्त डेटा ऑफर करतील.

जिओ आणि एअरटेल भारतातील पहिल्या दोन अश्या टेलीकॉम कंपन्या आहे, ज्यांनी सर्वप्रथम ५जी लाँच केलं होतं. सध्या भारतातील बहुतांश भागात या दोन्ही कंपन्यांची 5G सर्व्हिस पोहोचली आहे. जवळपास १ वर्षांपासून या दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांना 4G प्लॅनच्या किंमतीत 5G स्पीड देत आहेत. तसेच, आता या कंपन्यांनी या फ्री सर्व्हिसवर पूर्णविराम लावण्याची तयारी केली आहे. अद्याप एअरटेल आणि जियोनं याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

Reliance Jio रिपब्लिक डे ऑफर

Reliance Jio नं रिपब्लिक डे ऑफर आणली आहे. त्यामुळे कंपनीच्या एका अ‍ॅन्युअल प्लॅन सोबत अनेक एक्सट्रा बेनिफिट दिले जात आहे, या प्लॅनची किंमत २,९९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेली २.५ जीबी डेटा ऑफर केला जाईल. तसेच अनलिमिटेड कॉलिंग ऑफर केला जाईल. या ऑफरमध्ये युजर्सना अनेक प्रकारच्या मोफत सुविधा मिळत आहेत. जिओच्या रिपब्लिक डे ऑफरची सुरुवात १५ जानेवारी २०२४ म्हणजे कालपासून झाली आहे, या ऑफरचा फायदा ३१ जानेवारी २०२४ पर्यंत घेता येईल.

Source link

5G5g plansAirtelairtel 5g plansjiojio 5g plans
Comments (0)
Add Comment