बेळगावात एकीकरण समितीच्या पराभवामागे मोठं कारस्थान; राऊत यांचा आरोप

हायलाइट्स:

  • संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार निशाणा
  • बेळगाव महापालिका निवडणूक निकालावर केली टीका
  • निवडणुकीत कारस्थान झाल्याचाही व्यक्त केला संशय

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटणाऱ्यांना लाज वाटत नाही का, असा सवाल करत संजय राऊत यांनी बेळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं आहे.

बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव करत भाजपने बहुमत मिळवलं. या निवडणुकीत एकीकरण समितीला अवघ्या ३ जागा मिळाल्या. त्यामुळे दणदणीत विजय मिळवणाऱ्या भाजप समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

Konkan Ganeshotsav Toll Update: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खूशखबर; टोलबाबत झाला ‘हा’ निर्णय
महाराष्ट्र एकीकरण समिती ही मराठी माणसाची प्रातिनिधिकी संघटना आहे. या संघटनेच्या पराभवानंतर महाराष्ट्रात काही जण पेढे वाटत आहेत, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

एकीकरण समितीच्या पराभवामागे कारस्थान? संजय राऊत यांची शंका

महाराष्ट्र एकीकरण समितीने नेहमीच बेळगाव महापालिका निवडणुकीत चांगली टक्कर दिली आहे. यावेळी मात्र निवडणुकीत समितीच्या पदरी मोठं अपयश आलं. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एक शंका उपस्थित केली आहे. ‘यावेळी एकीकरण समितीला केवळ ३ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एकीकरण समितीचा पराभव करण्यासाठी यंदा किती मोठं कारस्थान झालं असेल याची कल्पना करवत नाही. याबाबतची माहिती पुढील काळात समोर येईलच,’ असं म्हणत संजय राऊत यांनी निवडणूक प्रक्रियेवर अप्रत्यक्षपणे शंका उपस्थित केली आहे.

Source link

belgaonSanjay RautShivsenaबेळगाव पालिकामहाराष्ट्र एकीकरण समितीसंजय राऊत
Comments (0)
Add Comment