कर्करोगग्रस्त व्यक्तीचा अचानक कान दुखू लागला; विमानाचे आपात्कालीन लॅण्डिंग, प्रकृती स्थिर

नागपूर: तोंडाचा कर्करोग असलेल्या एका ५८ वर्षीय व्यक्तीचा हवाई प्रवासादरम्यान मंगळवारी अचानक कान दुखू लागला. ही व्यक्ती कर्करोगग्रस्त असल्याने वैद्यकीय इमर्जन्सी लक्षात घेत इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक ६ई ५२९७ या कोलकाता-मुंबई विमानाचे आपात्कालीन लॅण्डिंग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आले.
पळून जात मुलीचा प्रेमविवाह; पित्याला अमान्य, लेकीला घरी बोलवले, जोडप्यासोबत बापाचे धक्कादायक कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, सुब्रत भारती असे या प्रवाशाचे नाव आहे. भारती यांना तोंडाचा कर्करोग आहे. अशा रुग्णांना बरेचदा तीव्र कानदुखीचा त्रास होत असतो. ते कर्करोगावरील उपचारासाठी कोलकाता येथून मुंबईला विमानाने जात होते. नियोजित वेळेनुसार, विमान कोलकाता येथून ९.१५ वाजता उडाले. प्रवासादरम्यान भारती यांचा अचानक कान दुखू लागला. वेदना असह्य होत असल्याचे त्यांनी विमानातील क्रु मेंबर्सला सांगितले. त्यांची वैद्यकीय पार्श्वभूमी लक्षात घेत नागपूर विमानतळावर आपात्कालीन लॅण्डिंगचा निर्णय घेण्यात आला.

जरांगेंचं आंदोलन ही आग, त्यात हात घालाल तर भाजल्याशिवाय राहणार नाही, राजू शेट्टींचं सरकारला आवाहन

त्यानुसार, विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. नागपूर विमानतळ प्रशासनाने आपात्कालीन लॅण्डिंगसाठी सज्जता दर्शविली. त्यानुसार सकाळी ११.१५ वाजतादरम्यान कोलकाता-मुंबई विमानाचे आपात्कालीन लॅण्डिंग करण्यात आले. लॅण्डिंग झाल्यानंतर विमानतळावर तैनात असलेल्या किम्स-किंग्ज्वे रुग्णालयाच्या वैद्यकीय चमूने भारती यांची प्राथमिक तपासणी करून रुग्णालयात भरती केले. सध्या त्यांच्यावर कर्करोगतज्ज्ञ डॉ. सौरभ प्रसाद यांच्या मार्गदर्शनात उपचार सुरू आहेत. रुग्णाची प्रकृती स्थिर असून बुधवारी सुटी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती, किम्स-किंग्ज्वे रुग्णालयाचे उपमहाव्यवस्थापक (ब्रॅण्डिंग अॅण्ड कम्युनिकेशन्स) एजाज शमी यांनी दिली.

Source link

emergency landing of planeemergency landing of plane in nagpurNagpur newsनागपूर बातमीनागपूर विमान आपात्कालीन लॅण्डिंग
Comments (0)
Add Comment