निरंकारी संत समागमात सहभागी व्हा, विद्यापीठाचे धार्मिक कार्यक्रमात जाण्यासंबंधी विद्यार्थ्यांना आदेश

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : विविध कॉलेजांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांना नागपुरात होणाऱ्या संत निरंकारी मंडळाच्या वार्षिक निरंकारी संत समागमात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे. अशैक्षणिक स्वरुपाच्या आणि खासगी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन विद्यापीठाने केल्याने विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

संत निरंकारी मंडळाच्यावतीने शहरात २६ ते २८ जानेवारीदरम्यान ५७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे. या संप्रदायाशी संबंधित भाविक या समागमात सहभागी होण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून येथे येणार आहेत. मिहानमधील पतंजली उद्योगाच्या जागेजवळ हा समागम होणार आहे.

‘धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरुपाच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे’, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले आहे. नागपूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व संस्था आणि कॉलेजे येथील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांना या समागम कार्यक्रमात सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कुलगुरू डॉ. चौधरी यांनी हे आवाहन केले असले तरीही त्यांचे आवाहन हे सूचना किंवा आदेशाप्रमाणे गृहित धरले जाते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी किंवा शैक्षणिक बाबींशी प्राथमिकदृष्ट्या या समागमाचा काहीही संबंध नसताना विद्यापीठाने विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना या समागमात सहभागी होण्यास सांगितले आहे.

दरम्यान, थेट अभ्यासक्रमाशी संबंध नसतानाही विद्यार्थ्यांना असे आवाहन का करण्यात आले याबाबत नागपूर विद्यापीठाची भूमिका स्पष्ट झालेली नाही.

Source link

annual nirankari sant samagamNagpur Universitynagpur university Newssant nirankari mandalvice chancellor of nagpur universityनागपूर विद्यापीठसंत निरंकारी मंडळसंत समागम
Comments (0)
Add Comment