भरधाव वेगात गाडी चालवणं जीवावर बेतलं; इंजिनिअरिंग विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत, परिसरात हळहळ

नागपूर: हिंगणा रोडवर तरुणाचे रॅश ड्रायव्हिंग इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीच्या मृत्यूचे कारण ठरले. ही विद्यार्थिनी दुचाकीच्या मागे बसलेली असताना भरधाव वेगामुळे गाडीचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दुचाकी चालकावर बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण; विधानसभा अध्यक्षांची आजची सुनावणी संपली, सुनावणीत काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या सुभाष नगर मेट्रो स्थानकाजवळील रायसोनी शाळेसमोर हा अपघात घडला. आदिती गौतम असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. आरोपी दुचाकीचालक बादल नागपुरे असल्याचे सांगण्यात येत आहे. आदिती ही मूळची गोंदिया येथील रहिवासी असून हिंगणा येथील कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फॉर वुमन येथे कॉम्प्युटर सायन्सच्या तृतीय वर्षात शिकत होती. अदिती पोलीस नगर येथे भाड्याने राहत होती. तर बादल हा मूळचा बालाघाटचा रहिवासी आहे. तोही नागपुरात शिकतो.

शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दोघेही बादल याच्या ४०० सीसी मोटारसायकलवरून हिंगणा रोडवरून घरी येत होते. सुभाष नगर मेट्रो स्थानकाजवळील रायसोनी शाळेसमोर बादल आपली दुचाकी भरधाव वेगात आणि बेदरकारपणे चालवत असताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी फूटपाथवर चढून झाडावर आदळली. या अपघातात गाडीच्या मागे बसलेली आदिती खाली पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी मदत करून जखमी विद्यार्थिनीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र रविवारी उपचारादरम्यान अदितीचा मृत्यू झाला.

पुण्यातील श्रीराम पथकाचे अयोध्येत होणार ढोल-ताशा वादन, रामजन्मभूमी न्यासाकडून निमंत्रण

नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. विद्यार्थिनीच्या वडिलांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत. मात्र, पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याची माहिती बादल पोलिसांना देत आहे. आता पोलीस या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. जेणे करून या घटनेमागचे खरे कारण कळू शकेल.

Source link

aditi gautam newshingana road accidentnagpur accident newsNagpur newsआदिती गौतम बातमीनागपूर अपघात बातमीनागपूर बातमीहिंगणा रोड अपघात
Comments (0)
Add Comment