Samsung Galaxy M55 5G दिसला बीआयएसवर
सॅमसंग गॅलेक्सी एम५५ BIS इंडिया वर SM-M556B/DS मॉडेल कोडसह दिसला आहे. बीआयएस लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की हा सॅमसंग फोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. या प्लॅटफॉर्म वर स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि इतर माहिती मिळाली नाही. आशा आहे की येत्या काही दिवसांत ब्रँडची अधिकृत घोषणा समोर येऊ शकते.
Samsung Galaxy M55 5G चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगच्या या नवीन डिव्हाइसमध्ये युजर्सना ६.७ इंचाचा सुपर अॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो ज्या १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चे प्रोटेक्शन मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या गीकबेंच लिस्टिंगनुसार, यात २.४० गीगाहर्टज चिपसेट असल्याचं सांगण्यात आलं आहे, त्यामुळे हा स्नॅपड्रॅगन ७ जेन १ चिपसेट मिळू शकतो.
गीकबेंच प्लॅटफॉर्मवर स्मार्टफोन ८जीबी पर्यंत रॅमसह लिस्ट झाला होता. म्हणजे फोनचा बेस मॉडेल ८जीबी सह लाँच होऊ शकतो. ऑपरेटिंग सिस्टम पाहता Samsung Galaxy M55 5G लेटेस्ट अँड्रॉइड १४ वर आधारित ठेवला जाऊ शकतो. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, परंतु कॅमेरा लेन्सची माहिती मिळाली नाही. जुन्या एम५४ मध्ये ६०००एमएएचची बॅटरी देण्यात आली होती त्यामुळे हा फोन देखील याच क्षमतेसह बाजारात येऊ शकतो.
सॅमसंगनं कमी केली गॅलेक्सी एम५४ ५जीची किंमत
सॅमसंग गॅलेक्सी ए५४ आता ३,५०० रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंट आणि रुपयांच्या बँक कॅशबॅकसह विकला जात आहे. यासाठी तुम्हाला अॅक्सिस बँकेच्या कार्डचा वापर करावा लागेल. या डिस्काउंट आणि बँक ऑफर नंतर फोनचा ८जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज असलेला मॉडेल फक्त ३३,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर ८जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेज मॉडेल ३५,४९९ रुपयांमध्ये तुमचा होईल.