शिवसेना ज्यांच्यामुळे दिग्गजांनी सोडली, त्यांच्याच हातून पक्ष सुटला, शर्मिला ठाकरेंचा टोला

मुंबई : आदित्य ठाकरे यांची बाजू घेणाऱ्या काकी अर्थात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या प्रतिक्रियेमुळे ठाकरे बंधूंमधील दुरावा कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र त्यानंतर काही दिवसातच ही दरी पुन्हा वाढल्याचं दिसलं. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या मनातील खदखद पुन्हा समोर आली. मनसेच्या विक्रोळी महोत्सवात त्या बोलत होत्या.

काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?

“एका वाक्यात सांगायचं तर आज एक सर्कल पूर्ण झालं आहे. आज म्हणण्यापेक्षा दहा तारखेला (दहा जानेवारी – राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेबाबत निकाल दिल्याचा दिवस). शिवसेनेतील ज्या दिग्गज नेत्यांना या माणसामुळे बाहेर जायला लागलं होतं. त्याच्याच हातातून पक्ष सुटला” अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली.

महाविकास आघाडी सोडली, पण दापोलीत ठाकरेंसोबत अजितदादा गटाची सत्ता कायम, कार्यकर्ते संभ्रमात
दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचं विश्लेषण करण्यासाठी बोलावलेल्या ‘जनता न्यायालया’वर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ताशेरे ओढले आहेत. “ही कल्पना जगात भारी आहे. आपल्या मनासारखा निकाल लागला नाही, तर आपलं स्वतःचं न्यायालय स्थापन करून आपल्या आवडीचा निर्णय लावून घ्यायचा…लई भारी!!” अशी पोस्ट देशपांडेंनी ‘एक्स’वर केली आहे.

संघाच्या स्वयंसेवकाचा जळगाव लोकसभेवर दावा, भाजप विद्यमान खासदाराचं तिकीट कापणार?

आदित्य ठाकरेंची पाठराखण

याआधी, मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला, पण तुम्ही ज्या भावाबरोबर लहानाचे मोठे झालात, त्याच्यावर थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली होती. शर्मिला ठाकरे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी स्थापन एसआयटी चौकशीवरून आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली होती. त्यावरून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले होते. त्यावर शर्मिला यांनी डिसेंबर महिन्यात प्रतिक्रिया दिली होती.

रामटेक लोकसभा निवडणूक ‘कमळा’वर लढवावी, शिवसेनेच्या जागेवर भाजपचा डोळा?
“मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला, ज्या भावासोबत तुम्ही लहानाचे मोठे झालात, त्याला किणी केसच्या वेळी काय मदत केलीत? आजपर्यंत टोमणे देणं त्यांनी कधी थांबवलं आहे? कुठचीही वेळ आली की किणी केसवरुन टोमणे देतात. तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा, मग आम्हीपण आभार मानू” असंही शर्मिला ठाकरे त्यावेळी म्हणाल्या होत्या.

लवाद म्हणत राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल, भाषणात संजय राऊतांनी सगळंच काढलं

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

raj thackerayraj thackeray wifeSharmila Thackerayshivsena mla disqualification caseUddhav Thackerayउद्धव ठाकरेराज ठाकरेशर्मिला ठाकरेशिवसेना आमदार अपात्रता प्रकरण
Comments (0)
Add Comment