शरद मोहोळ हत्याप्रकरणात नवी अपडेट, शेलार-मारणे टोळींची युती, महिनाभरापूर्वी मुळशीत बैठक

पुणे: शरद मोहोळचा खून करण्यासाठी दोन गुन्हेगारी टोळ्यांनी युती केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यामध्ये एक टोळी विठ्ठल शेलारची असून, दुसऱ्या टोळीचा प्रमुख गणेश मारणे याचा पोलिस शोध घेत आहेत. ‘मोहोळच्या खुनाआधी एक महिना विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांची मुळशीत बैठक झाली होती,’ असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी पाच जानेवारी रोजी शरद मोहोळचा गोळ्या झाडून खून केला होता. या प्रकरणात आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे; तसेच आठ ते नऊ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विठ्ठल महादेव शेलार (वय ३६) आणि रामदास ऊर्फ वाघ्या मारणे (वय ३६, दोघेही रा. मुळशी) या दोघांना सोमवारी (१५ जानेवारी) पनवेल परिसरातून ताब्यात घेतले होते. शेलार यांच्या सांगण्यावरूनच मोहोळचा खून करण्यात आल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली होती.

मुलाला मारण्याआधी गायली अंगाई; कफ सिरप, डॉक्टरांना फोन अन्.. सूचनाने चौकशीत काय-काय सांगितलं?
या दोघांना मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सहायक सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी आरोपींना सात दिवस पोलिस कोठडीची देण्याची मागणी केली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बचाव पक्षाचे वकील डी. एस. भोईटे यांनी पोलिस कोठडीला विरोध केला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेलारला चौकशीसाठी बोलावले असता, तो चौकशीसाठी देखील गेला होता. तो पोलिसांपासून पळूनही गेला नव्हता, असे अॅड. भोईटे यांनी न्यायालयात सांगितले. दरम्यान, ‘केस डायरी’ व्यवस्थित नसल्याची बाब यावेळी न्यायालयाने अधोरेखित केली.

दरम्यान, ‘वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमध्ये नाव छापून येते, पोलिस अधिकाऱ्यांना प्रसिद्धी मिळते. या कारणामुळे खून प्रकरणाशी संबंध नसतानाही, केवळ सराइत गुन्हेगार आहे, म्हणून पोलिसांनी शेलार, मारणेला अटक केली आहे,’ असा आरोप बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. यावर ‘आरोपी शेलार आणि दुसऱ्या सूत्रधारात मुळशी येथे बैठक झाली होती. या बैठकीत महत्त्वाच्या घडामोडी आहेत. दुसऱ्या सूत्रधाराचे नाव सध्या खुलेआम सांगणे योग्य नाही. ‘केस डायरी’मध्ये सूत्रधाराचे नाव न्यायालयाला सादर केले आहे,’ असे तपास अधिकारी सहायक आयुक्त सुनील तांबे न्यायालयात सांगितले.

पुण्यातील नामांकित वकिलांसोबत शांत डोक्याने प्लॅन; डोळ्यांदेखत ‘रेकी’ करुन साथीदारांनी मोहोळचा काटा काढला

‘मकोका’ लावण्याची तयारी?

या प्रकरणात आतापर्यंत एकूण पंधरा आरोपींना अटक करण्यात आली आहे. शेलार आणि मारणे या दोघांची अटक म्हणजे, या गुन्ह्यातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यासाठी पोलिसांची तयारी असल्याचा युक्तीवाद बचाव पक्षाचा वकिलांनी केला.

वरळीतील धक्कादायक प्रकार; बार्बेक्यू नेशनमधून मागवलेल्या जेवणात सापडला उंदीर अन् झुरळ
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Pune crime newspune gangster murdersharad mohol murder case updatesharad mohol murder puneपुणे बातम्याशरद मोहोळ हत्याशरद मोहोळ हत्याकांड
Comments (0)
Add Comment