कोल्हापूर, सांगली, सातारा त्याचबरोबर संभाजीनगर मधून सुद्धा मराठा क्रांती मोर्चा चे बंधू-भगिनी समन्वयक या मेळाव्यासाठी येत आहेत. आम्हाला आमची अस्मिता टिकवायची आहे. आम्हाला स्वतंत्र मराठा आरक्षण हवे आहे. ज्यांना घ्या आमचा कोणालाही विरोध नाही, अशी स्पष्ट भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजन घाग यांनी मांडली आहे. या मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेतच कोकण क्षत्रीय मराठा समाजाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. ज्यांना कुणबी नोंदी मिळत आहेत त्यांनी खुशाल कुणबी मराठा दाखला घ्यावा, अशी भूमिका याचबरोबर स्पष्ट करण्यात आली आहे.
मुंबई सह समस्त कोकणातील मराठ्यांनी एकत्र येऊन कोकणातील मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण घेणे मान्य नाही अशी भूमिका घेतली. कायद्यानुसार सरसकट कुणबीकरण शक्य ही नाही. कुणबी म्हणून ज्यांच्या नोंदी मिळत असतील तर त्यांनी ते जरूर घ्यावे, आमचा त्यांना विरोध नाही. भविष्यात जर मराठा ही जात व ओळख कायम राहायचे असेल तर कोकणातील मराठ्यांनी प्रचंड संख्येने पुढे येऊन आपली मागणी सरकार पुढे मांडली पाहिजे म्हणून मराठ्यांना आरक्षण फक्त मराठा म्हणूनच आणि तेही टिकणारे या मागणीसाठी हा भव्य मेळावा आयोजित करण्यात येत असल्याची भूमिका या निमंत्रण पत्रिकेतच स्पष्ट करण्यात आली आहे.
बुधवार दिनांक १७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता कालभैरव देवस्थान प्रांगण कै. बापू सागावकर मैदान चिपळण येथे क्षत्रिय मराठा समाजाचा भव्य मेळावा होत आहे. तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची, महाराष्ट्राची निर्मिती केली त्या छत्रपतींचे मावळे, मराठा म्हणून आपली ओळख, स्वाभिमान व अस्मिता जर कायम टिकवायची असेल तर प्रचंड संख्येने या मेळाव्याला उपस्थित रहावे असेही या आमंत्रण पत्रिकेवर आवाहन करण्यात आल आहे. सकाळी ११ वाजता शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे स्वागत,प्रास्ताविक ,मराठा आरक्षण अभ्यासक श्री राजेंद्र कोंढरे यांचे मार्गदर्शन तसेच समर्थनार्थ आलेल्या आमदार, खासदार, व मान्यवरांचे मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. क्षत्रिय मराठा समाज कोकण यांच्याकडून या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे. आता आज होणाऱ्या वेळात कोण कोण आमदार, खासदार उपस्थित राहून आपली भूमिका मांडतात हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.