कोणते असणार पर्यायी मार्ग
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने मुंबई लेन कि.मी. ५५.००० वरून वळवून मुं
बई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून मार्गस्त करता येतील.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने व बसेस मुंबई लेन कि.मी. ३९.८०० खोपोली एक्झिट वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून मार्गस्त करता येतील.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने ही खालापूर टोल नाका शेवटच्या लेन ने खालापूर एक्झिट कि.मी. ३२.५०० येथून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्त करता येतील.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने मुंबई लेन कि.मी. ९.६०० पनवेल एक्झिट वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून करंजाडे मार्गे कळंबोली अशी मार्गस्थ करता येतील.
मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी सर्व प्रकारची वाहने शेडुंग फाट्यावरून पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.
दरम्यान, वाहनचालकांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News