मला भाजप प्रवेशाची ऑफर देणारा मोठा माणूस आहे, पण मी काँग्रेस सोडणार नाही : सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : मला भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी मोठ्या माणसाने ऑफर दिली होती. तो कोण माणूस आहे हे मी सांगणार नाही. तसं नाव घेऊही नये. पण मी काँग्रेसी विचारांचा व्यक्ती आहे. काँग्रेस पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवरच शिंदे यांनी आज सोलापुरात माध्यमांशी संवाद साधला.

लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होऊनही मला भारतीय जनता पक्षाची ऑफर दिली. मला आणि प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर आहे. ते ही मोठ्या माणसाने मला पक्षप्रवेशाची ऑफर दिलीये, असा गौप्यस्फोट सुशीलकुमार शिंदे यांनी अक्कलकोट एका कार्यक्रमात बोलताना केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सौलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्याआधी सुशीलकुमार शिंदे यांनी गौप्यस्फोट केल्याने राज्याच्या राजकारणात भूकंप घडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र या सगळ्या चर्चांचं सरतेशेवटी शिंदे यांनी खंडन केलं आहे.

मी काँग्रेस विचारांचा माणूस, पक्ष सोडणार नाही

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, माझ्या भाजप प्रवेशासाठी मोठ्या माणसाने ऑफर दिली होती. तो कोण माणूस आहे हे मी सांगणार नाही. तसं सांगूही नये. पण मी काँग्रेसी विचारांचा व्यक्ती आहे. काँग्रेस पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. ज्या आईच्या कुशीत आमचं बालपण गेलं. ज्या पक्षात तारुण्य गेलं. आता मी ८३ वर्षांचा आहे. या वयात मी पक्ष कसा सोडणार? मी काँग्रेस पक्ष सोडून कुठेच जाणार नाही, असं स्पष्टपणे शिंदे यांनी सांगितलं.

मोदींच्या दौऱ्यापूर्वी चंद्रकांतदादा सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीला; ‘त्या’ गौप्यस्फोटामुळे राजकीय भूकंपाचे संकेत
“त्यांना वाटेल ते करू दे… मला जे काही करायचंय ते मी करेन…”

लोकसभा निवडणूक २०१९ आणि आता येऊ घातलेली २०२४ ची निवडणूक दोन्ही वेळी तुम्हाला भाजप प्रवेशाची ऑफर आलेली आहे, भाजपला नेमकं काय करायचं आहे, काँग्रेस पक्ष फोडायचा आहे? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, “भाजपला नेमकं काय करायचंय हे मला माहिती नाही, त्यांना जे काय करायचंय ते त्यांना करू दे.. मला जे काही करायचंय ते मी करेन…”

मला भाजपची ऑफर, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट; महाजन म्हणाले, स्वागतच करू; नाना खवळले
काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न होतोय?

मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेस पक्षात जे तरुण आश्वासक नेते आहेत, जे दीर्घकाळ नेतृत्व करू शकतात, त्यांच्यावर भाजपची नजर आहे का? प्रणिती यांना त्याच दृष्टीकोनातून भाजपने ऑफर दिली आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर शिंदे म्हणाले, मी जसं काँग्रेस सोडण्याच्या चर्चांचं स्पष्टपणे खंडन केलं, तसेच स्पष्टीकरण प्रणितीने देखील दिलं आहे. आणखी आम्ही काय सांगू… असं म्हणत कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष सोडणार नाही, हेच शिंदे यांनी सांगितलं.

अयोध्येत रामनवमीला प्राणप्रतिष्ठा झाली असती, पण भाजपला निवडणुकी अगोदर करण्याची घाई | प्रणिती शिंदे

Source link

Sushilkumar Shindesushilkumar shinde bjp offersushilkumar shinde newsनरेंद्र मोदी सोलापूर दौरासुशीलकुमार शिंदेसुशीलकुमार शिंदे भाजप ऑफर
Comments (0)
Add Comment