पदभरतीचा तपशील :
एकूण रिक्त जागा : ७१ पदे
पदनिहाय जागांचा तपशील :
कुक : ३ जागा
सिव्हीलियन केटरिंग इंस्ट्र्क्टर : ३ जागा
एम टी एस-चौकीदार : २ जागा
ट्रेड्समन मेट : ८ जागा
वाहन मेकॅनिक : १ जागा
सिव्हीलियन मोटर ड्रायवर : ९ जागा
क्लीनर : ४ जागा
लीडिंग फायरमन : १ जागा
फायरमन : ३० जागा
फायर इंजिन ड्रायवर : १० जागा
महत्त्वाचे : वरील सर्व जागांच्या भरतीसाठी पुरुष उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे.
वयोमर्यादा :
यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २ फेब्रुवारी २०२४ रोजी १८ ते २७ वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. यामध्ये SC/ST उमेदवारांना पाच वर्षे तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षाची क्षितिलाता देखील देण्यात आलेली आहे.
मिळणार एवढा पगार :
ही भरती संपूर्ण भारतभर होणार आहे, ASC Centre South Bharti मध्ये उमेदवाराला दरमहा पदांनुसार १८ हजार ते २१ हजार ७०० पगार दिला जानर आहे.
अर्ज शुल्का विषयी :
या भरतीसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकणार असून, यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही.
या पत्त्यावर पाठवा अर्ज :
उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (दक्षिण)-2 ATC, आग्राम पोस्ट, बंगलोर-०७ या पत्त्यावर दिनांक २ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सादर करायचे आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.
- यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच अवजड वाहन चालविण्याचा तीन वर्षाचा अनुभव असावा.
- उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- भरतीचे इतर सर्व अधिकार ASC Centre South यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
पदभरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.