फार्मसीच्या विद्यार्थ्यांवर ‘संक्रांत’; एकाच विषयात अनेक विद्यार्थी नापास, पाचव्या सत्राचा गोंधळ

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : बीफार्म अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्रातील ‘फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स’ या एकाच विषयात अनेक विद्यार्थी एकाचवेळी अनुत्तीर्ण झाल्याने फार्मसी अभ्यासक्रम वर्तुळात गोंधळ उडाला आहे. शहरातील जवळपास सर्व फार्मसी कॉलेजांमधील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.

मोठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या बीफार्म अभ्यासक्रमातील पाचव्या सत्राचा निकाल अलीकडेच जाहीर करण्यात आला. मात्र, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स’ विषयात मोठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. एकेका कॉलेजमधील निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी या विषयांमधील विद्यार्थ्यांना हा फटका बसला. बहुतांश फार्मसी कॉलेजमध्ये हा प्रकार घडल्याने कॉलेजे आणि विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना ७५पैकी केवळ २० ते २५ गुण देण्यात आले आहेत.

विद्यार्थी अनुत्तीर्ण कसे झाले?

हा गोंधळ झाल्यानंतर विविध कॉलेजांनी विद्यापीठाशी तत्काळ संपर्क साधून याबाबत माहिती देत या गोंधळावर उपाययोजना करण्याचे आवाहन केले. त्यानंतर आता विद्यापीठाने याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. ‘अनेक कॉलेजांच्या प्राचार्यांनी यासंदर्भात आमच्याशी संपर्क साधला आहे. या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना कसे गुण मिळाले आहेत, याची माहिती मागविली आहे. ६० टक्क्यांच्यावर किती विद्यार्थ्यांना गुण मिळाले तसेच ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण किती जणांना आहेत, याची आकडेवारी गोळा करण्यात येत आहे. इतके विद्यार्थी अनुत्तीर्ण कसे झाले, याची कारणे आम्ही शोधत आहोत. अभ्यासमंडळाच्या अध्यक्षांशी पण याबाबत चर्चा केली आहे. फार्मसीमधील कायद्यांशी संबंधित हा विषय आहे. सर्व कारणे शोधल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येईल’, असे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.
विद्यापीठ परीक्षेत पुन्हा गोंधळ; MCA प्रात्यक्षिकसाठी विद्यार्थी ताटकळले, आज होणार परीक्षा
दरम्यान, मोठ्या संख्येने आणि अनेक कॉलेजांशी संबंधित हा विषय असल्याने त्यावर विद्यापीठाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

Source link

B pharmcy examNagpur Universitynagpur university examsPharmaceutical JurisprudenceRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityएकाच विषयात अनेक विद्यार्थी अनुत्तीर्णफार्मसी अभ्यासक्रमराष्ट्रसंत तुकडोजी महाराज
Comments (0)
Add Comment