OPPO F25 इंडिया लाँच
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर OPPO F25 डिवाइस बद्दल टिपस्टर अभिषेक यादवनं लाँच टाइमलाइन शेयर केली आहे. त्यानुसार हा फोन पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये लाँच केला जाऊ शकतो. टिपस्टरनुसार, मोबाइल Oppo Reno 11F 5G चा रिब्रँड ब्रँड व्हर्जन असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे Oppo Reno 11F 5G ची लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्स याआधी देखील समोर आले होते. म्हणजे की भारतात येणाऱ्या OPPO F25 मध्ये देखील याचे स्पेसिफिकेशन मिळू शकतात.
OPPO F25 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
भारतात येणाऱ्या OPPO F25 5G ६.७ इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह सादर होऊ शकतो. जो FHD+ रिजॉल्यूशन, १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, २१६०हर्ट्झ PWM डिमिंग आणि १०-बिट कलर सारखे फीचर्स मिळू शकतात. मोबाइलमध्ये Mediatek Dimensity 7050 चिपसेटचा वापर केला जाऊ शकतो. डिव्हाइसमध्ये ८ जीबी रॅमसह २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकतो. त्याचबरोबर ६जीबी व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट देखील दिला जाऊ शकतो.
OPPO F25 5G डिवाइस भारतात शानदार ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो. यात LED फ्लॅशच्या ओमनीव्हिजन OV64B प्रायमरी कॅमेरा, ८-मेगापिक्सलचा Sony IMX355 अल्ट्रा-वाइड लेन्स आणि २-मेगापिक्सलचा ओमनीव्हिजन OV02B10 मॅक्रो कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी ३२-मेगापिक्सलचा Sony IMX615 फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
OPPO F25 5G भारतात लेटेस्ट अँड्रॉइड १४ आधारित कलरओएस१४ वर आधारित असू शकतो. पावर बॅकअपसाठी यात ६७वॉट फास्ट चार्जिंगसह ५०००एमएएचची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. हा नवीन ओप्पो फोन कंपनी आयपी६५ रेटिंग, ड्युअल सिम ५जी, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ब्लूटूथ, वायफायसह येऊ शकतो.