धक्कादायक! १४ लाखांच्या कर्जापोटी उकळले ५० लाख रुपये; जमीनही केली हडप

हायलाइट्स:

  • सांगलीतील धक्कादायक प्रकार उघडकीस
  • व्याजासाठी जीवे मारण्याची धमकी देत जमीन नावावर करून घेतली
  • शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगली : पाच टक्के व्याज दराने १४ लाखांच्या कर्जापोटी ३४ लाख रुपये व्याज घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसंच व्याजासह ५० लाख रुपये देऊन देखील अधिकच्या व्याजासाठी जीवे मारण्याची धमकी देत जमीन नावावर करून घेण्यात आली. या प्रकरणी सांगलीतील खासगी सावकारांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय उत्तम तावदारकर (वय ३३, रा. खणभाग) व राहुल दादा (पूर्ण नाव नाही) असं गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचं नाव आहे. या प्रकरणी सुहास प्रकाश मोहिते (वय ३२, रा. सांगलीवाडी) यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. ५ एप्रिल २०२१ ते ०४ सप्टेंबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.

corona latest updates करोना: आज राज्याला मोठा दिलासा; मृत्यूदर मात्र अनेक दिवसांपासून स्थिर

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुहास मोहिते यांचा व्यापार असून, ०४ एप्रिल २०२१ रोजी संजय तावदारकर यांच्याकडून त्यांनी ५ टक्के व्याजाने १४ लाख रुपये घेतले होते. तावदारकर याने व्याजापोटी सहा महिन्यात तब्बल ३४ लाख रुपये वसूल केले आहेत. मोहिते यांनी मुद्दल व व्याज असे एकूण ५० लाख रुपये परत केले. मात्र त्यानंतरही तावदारकर याने मोहिते आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसंच नातेवाईक व समाजात बदनामी करण्याची धमकी देऊन अधिक व्याजाच्या रकमेसाठी तगादा लावला होता.

मोहिते यांना धमकावून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील त्यांची जमीन रोखीने खरेदी केली आहे, असं खरेदीपत्र तयाक केले. शिवाय व्याजाच्या रकमेसाठी सर्व प्रॉपर्टी आमच्या नावावर करून दे, नाहीतर तुझं काही खरं नाही, असं सांगून धमकावलं. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून मोहिते यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून बेकायदेशीर खासगी सावकारी प्रकरणी संजय तावदारकर आणि राहुल दादा या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

Source link

crime newssangali newsसांगलीसांगली न्यूजसांगली पोलीस
Comments (0)
Add Comment