हस्ते संपन्न झाला.
६२,५०० पुस्तकं रचून मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. मंदिर संपूर्ण उभं करायला ३० दिवस लागले असून मंदिर ५० फूट उंच ८० फूट रुंद ४० फूट लांबी आहे.
डोंबिवली येथे १९ तारखेपासून पुस्तक आदान प्रदान सोहळा सुरू होत आहे. यंदा सोहळ्याचे सातवे वर्ष असून या वर्षी येथे आकर्षण म्हणून ६२,५०० पुस्तकांनी राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. येत्या शुक्रवारी १९ तारखेला मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. १० दिवस हा सोहळा डोंबिवलीच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे होणार असून या दिवसात मुख्यमंत्री, इतर मंत्री, अनेक साहित्यिक, लेखक, वैज्ञानिक यांची उपस्थिती असणार आहे. या सोहळ्याची यंदाची थीम विज्ञान आणि वैज्ञानिक आहे.
संपूर्ण उभं करायला ३० दिवस.
५० फूट उंच
८० फूट रुंद
४० फूट लांबी
कलादिग्दर्शक सिद्धार्थ बागवे आणि सहकारी.
संकल्पना – पै फ्रेंडस लायबरी