टेक ब्रँड ऑनरनं आपल्या Magic लाइनअपचे दोन नवीन स्मार्टफोन्स Honor Magic 6 आणि Magic 6 Pro चिनी मार्केटमध्ये सादर केले आहेत. हे ११ जानेवारीला लाँच करण्यात आले होते आणि आज १८ जानेवारीला सकाळी १० वाजता यांची विक्री सुरु झाली. आता ब्रँडनं चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर केलेल्या एका पोस्टमध्ये सांगितलं आहे की या दोन्ही डिवाइसना बाजारात असा प्रतिसाद मिळाला आहे की जणू बाजारात दुसरा स्मार्टफोनचं उपलब्ध नाही.
८०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची कमाई
ऑनरनं ग्राहकांकडून मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाची माहिती देत लिहलं आहे की Honor Magic 6 आणि Magic 6 Pro चीनमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर सुरु असलेल्या सेलमध्ये चुटकीसरशी विकले गेले. कंपनीनं या स्मार्टफोन्सच्या पहिल्या सेलमध्ये ३ मिनिटांच्या कालावधीत ६६ कोटी युआन (सुमारे १०.४ कोटी डॉलर) ची कामे केली. भारतीय चलनात ही रक्कम ८६४ कोटी रुपयांच्या आसपास आहे.
कंपनीनुसार, ही जबरदस्त विक्री करण्यास त्यांना फक्त २ मिनिटे आणि ३५ सेकंदाचा वेळ लागला. हिशोब केल्यास कंपनीनं प्रत्येक सेकंदाला ५.५७ कोटी रुपयांचे Honor Magic 6 आणि Magic 6 Pro स्मार्टफोन्स विकेल आहेत. या आकडेवारीने गेल्यावर्षी लाँच झालेल्या Honor Magic 5 सीरीजच्या पहिल्या दिवसाच्या एकूण विक्रीला देखील मागे टाकले आहे.
इतकी आहे नवीन स्मार्टफोन्सची किंमत
Honor Magic 6 चा १२जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत ४,३९९ युआन (सुमारे ५२,००० रुपये) ठेवण्यात आली आहे. तसेच Magic 6 Pro ची प्रारंभिक किंमत ५,६९९ युआन (सुमारे ६७,५०० रुपये) आहे. सर्व व्हेरिएंट्सच्या सरासरी किंमतचा आधार घेतल्यास कंपनीनं नवीन Honor डिवाइसचे सुमारे १२०,०२१ यूनिट्स विकले आहेत.