तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख
Pune Kondhwa – वाढत्या प्रमाणात दाखल होणा-या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्याचे अनुषंगाने मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – ५ श्री आर राजा यांनी योग्य त्या उपाययोजना आखुन बातमीदारांशी संपर्क करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विशाल मेमाणे यांना त्यांचे गुप्त माहीतीदाराने माहीती दिली की, दोन इसम कोंढवा बोपदेव घाटाकडे जाणारा रोड आजीचा ढाबा हॉटेलचे समोर दोन दुचाकी विक्री करीता घेवुन आलेले असुन त्यांचेकडे असलेल्या दुचाकी चोरीच्या आहेत. असे सांगितल्याने सदरची बातमी त्यांनी सहा पोलीस निरीक्षक, श्री. दिनेशकुमार पाटील यांना कळविल्याने त्यांनी लागलीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आजीचा ढाबा हॉटेलचे समोर दोन संशयित इसमांना वाहनांसोबत ताब्यात घेतले. व चौकशी दरम्यान त्यांचेकडे मिळून आलेल्या दु-चाकी चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले, त्या दोन्ही इसमांची नावे सौरभ व्यंकटराव मोरे वय
२३ वर्षे, धंदा नोकरी, मुळ रा. मु. पो. वाघदरी, ता. देवणी, जि. लातुर सध्या रा. वासुली फाटा,
सुनिल गावडे यांचेकडे माडचाने चाकण एमआयडीसी पुणे व सुर्यप्रताप गंधर्वसिंग
कुशवाह, वय २३ वर्षे, धंदा नोकरी, मुळ रा. बासगड, तहसील करेरा, जिल्हा शिवपुरी, राज्य
मध्यप्रदेश सध्या रा. वासुली फाटा, सुनिल
गावडे यांचेकडे भाड्याने चाकण एमआयडीसी
पुणे अशी असुन त्यातील सौरभ व्यंकटराव मोरे याचेकडे बोरीचे वाहनांबाबत अधिक तपास
करता त्याने त्याचा साथीदार सुर्यप्रताप
कुशवाह याचेसोबत मिळुन आणखी ५ ठिकाणी
वाहने चोरी केल्याचे चौकशी दरम्यान त्यांचेकडे मिळून आलेल्या दु- चाकी चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाले, त्या दोन्ही इसमांची नावे सौरभ व्यंकटराव मोरे वय २३ वर्षे, धंदा नोकरी, मुळ रा. मु. पो. वाघदरी, ता. देवणी, जि. लातुर सध्या रा. वासुली फाटा, सुनिल गावडे यांचेकडे माडचाने चाकण एमआयडीसी पुणे व सुर्यप्रताप गंधर्वसिंग कुशवाह, वय २३ वर्षे, धंदा नोकरी, मुळ रा.
बासगड, तहसील करेरा, जिल्हा शिवपुरी, राज्य
मध्यप्रदेश सध्या रा. वासुली फाटा, सुनिल
गावडे यांचेकडे भाड्याने चाकण एमआयडीसी
पुणे अशी असुन त्यातील सौरभ व्यंकटराव मोरे
याचेकडे बोरीचे वाहनांबाबत अधिक तपास
करता त्याने त्याचा साथीदार सुर्यप्रताप
कुशवाह याचेसोबत मिळुन आणखी ५ ठिकाणी
वाहने चोरी केल्याचे एकुण ७ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलेले आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, श्री मा. अपर पोलीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-५ श्री आर राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री. शाहुराव साळवे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष सोनवणे कोंढया पोलीस स्टेशन, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सपोनि दिनेशकुमार पाटील, सपोनि लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, सतिश चव्हाण, निलेश देसाई, लवेश शिंदे, शाहीद
शेख संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, या पथकाने केली आहे.