याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की ,मृत दादासाहेब चौगुले यांचा मुलगा गणेश याने संशयित आरोपी सुरेश महादेव पाटील यांच्या मुलगीला बुधवारी पहाटे प्रेम संबधातून पळवून नेल्याच्या रागातून ही घटना घडली. दादासाहेब चौगुले आणि त्यांची पत्नी राजश्री पहाटे मोटर सायकल वरून जनावरांचे दुध काढण्यासाठी धनटेक वसाहत येथील जनावरांच्या शेडवर सुरेश पाटील गेले. दादासाहेब चौगुले यांचे शेड व पाटील यांचे राहते घर जवळजवळ आहेत.
दादासाहेब चौगुले दूध काढण्यासाठी आल्याचे समजताच सुरेश पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दादासाहेब चौगुले व त्यांच्या पत्नीला आमची मुलगी तुमचा मुलगा घेवून गेला आहे ते कोठे आहेत ते सांगा, असा प्रश्न विचारला. यावेळी दादासाहेब यांनी आम्ही आत्ताच आलो आहे, आम्हाला माहिती नाही असे सांगितले. त्यावेळी सुरेश पाटील व अन्य पाच जणांनी त्यांना विद्युत खांबाला बांधून घालून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण झाल्या नंतर दादासाहेब चौगुले बेशुद्ध पडले त्यांनतर पाटील कुटुंबीयांनी त्यांना येथील खसगी रुग्णालयात दाखल केले.. त्यावेळी त्यांना पुढे घेवून जाण्याचा सल्ला देण्यात आला .त्यानंतर शिराळा येथील उपजिल्हा रूग्णालयात त्यांना दाखल केले. मात्र, उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
याबाबत अटक करण्यात आलेल्या चार संशयितांच्यासह कविता संजय पाटील, पद्मा सुरेश पाटील, शुभांगी प्रविण पाटील, प्रविण राजाराम पाटील, सनीराज संजय पाटील, संग्रामसिंग भालचंद्र पाटील, सचिन बाबूराव पाटील, अजय अरविंद पाटील, (रा.मांगले) यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली, असं तक्रारीत म्हटलं आहे. या मारहाणीत दादासो चौगुले यांचा मृत्यू झाला. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम हे करीत आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News