नागपूर : नागपूर शहरातील हजारीपहाड परिसरात भीषण दुर्घटना घडली. गोरखेडे कॉम्प्लेक्सजवळ झोपडीत लागलेल्या आगीत दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. दिवांश रणजित उईके (७) आणि प्रभास रणजित उईके (२) अशी मृत मुलांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि गिट्टीखदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. मात्र, आग कशी लागली याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. रात्री नऊच्या सुमारास ही आग लागल्याचा अंदाज आहे.
गोविंद घोरपडे कॉम्प्लेक्सजवळील आऊटहाऊस सारख्या घरात आई, एक मुलगी आणि दोन मुले राहत होती. सद्या नागपुरात थंडीचे वातावरण सुरू आहे, त्यामुळे हात शेकण्यासाठी घरात आग पेटवण्यात आली होती, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्यावेळी घरात आग पेटवण्यात आली होती त्यावेळी घरात तीन मुले आणि त्यांची आई होती. मात्र, त्यांची आई काही कामानिमित्त बाहेर गेली असता अचानक घरात आग लागली पसरली.

आग लागल्यानंतर घरात असलेली मुलगी बाहेर आली, मात्र दोन्ही मुले घरात अडकली, त्यामुळे दोन्ही मुलांना आपला जीव गमवावा लागला. मुलगी बाहेर येताच तिने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना गोळा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलाला घेटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तात्काळ आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत घरात असलेली दोन्ही मुलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलांचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.