घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी खोपोली येथील अपघाताग्रस्त टीम आणि दस्तुरी बोरघाट पोलीस दाखल झाली होती. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनकरता खोपोली नगरपालिका रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसेच अपघातग्रस्त आयशर टेम्पो बाजूला घेण्यात आला आहे. या अपघातामुळे पुणे मुंबई लेनवरील वाहतूक खंडाळा घाटात विस्कळित झाली होती.
पहाटेच्या वेळी अचानक झालेल्या अपघाताने काही वेळ वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले होते. पुणे – मुंबई महामार्गावर झाल्याने वाहनात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने ही कामगिरी पार पाडली आहे. मुंबई – पुणे महामार्गावरून वाहनांची २४ तास ये-जा सुरू असते. चालकाला लागलेल्या डुलकीमुळे हा अपघात झाला आहे. वाहनाचा वेग आधिक असल्याने धडक जोरात बसल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
द्रुतगती महामार्गावर सद्या कामानिमित्त ब्लॉक घेण्याचे काम सुरू असून त्यामुळे महामार्ग काही तासांसाठी बंद करण्यात येत आहे. त्यातच असे अपघात घडत असल्याने पुन्हा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहने चालवताना काळजीपूर्वक चालवावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.