स्वस्तात फोल्डेबल फोनची मजा हवी? Tecno Phantom V2 Fold झाला वेबसाइटवर लिस्ट

टेक्नोनं गेल्यावर्षी आपला फोल्डेबल डिवाइस Tecno Phantom V Fold लाँच केला होता. तसेच, आता नवीन मॉडेल Tecno Phantom V2 Fold लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. मोबाइल बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंचवर प्रमुख स्पेसिफिकेशनसह दिसला आहे. चला, जाणून घेऊया समोर आलेल्या लिस्टिंग डिटेल्स.

Tecno Phantom V2 Fold गीकबेंच लिस्टिंग

Tecno चा नवीन फोल्डेबल फोन एई१० मॉडेल नंबरसह गीकबेंच डेटाबेसवर लिस्ट करण्यात आला आहे. फोनला सिंगल-कोर मध्ये १,२७३ आणि मल्टीकोर टेस्टमध्ये ३,८४४ स्कोर मिळाला आहे. डिवाइससाठी XYZ-MARS कोडनेम असलेला मदरबोर्ड दिसला आहे. यात मीडियाटेक डायमेन्सिटी ९०००+ चिपसेट असू शकतो. लिस्टिंग नुसार डिव्हाइसमध्ये १२जीबी रॅम मिळेल. हा अँड्रॉइड १४ सह लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Tecno Phantom V Fold चे स्पेसिफिकेशन्स

Tecno Phantom V Fold दोन डिस्प्ले मिळतात, ज्यात ७.६५ इंचाचा एलटीपीओ अ‍ॅमोलेड प्रायमरी डिस्प्ले आहे. तर बाहेरच्या बाजूला ६.४२ इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. दोन्ही स्क्रीनवर १२०Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये ४५वॉट फास्ट चार्जिगसह ५,०००एमएएचची मोठी बॅटरी आहे.

टेक्नो फँटम वी फोल्ड ५जी मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ९०००+ ऑक्टाकोर प्रोसेसर मिळतो. हा ३.२गिगाहर्टझ हाय क्लॉक स्पीडवर आधारित आहे. यात १२ जीबी एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि ५१२ जीबी यूएफएस३.१ इंटरनल स्टोरेज मिळते.

फोटोग्राफीसाठी यात दोन फ्रंट कॅमेरा आणि रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या कव्हर स्क्रीनवर ३२एमपीचा आणि इनर स्क्रीनवर १६एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. तर मागे ५० मेगापिक्सलचा प्रायमरी, ५० मेगापिक्सलची पोर्ट्रेट टेलीफोटो आणि १३ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे.

लाँचच्या वेळी याची किंमत ८८,८८८ रुपये होती, जी सॅमसंग आणि तर फोल्डेबल डिव्हाइस पेक्षा खूप स्वस्त होती. नवीन फोन देखील अश्याच कमी किंमतीत येईल अशी अपेक्षा आहे. आता ही किंमत किती असेल ते लाँचनंतरच समजेल.

Source link

tecno phantom v2 foldtecno phantom v2 fold geekbenchटेक्नो फोनटेक्नो फोल्ड फोनस्वस्त फोल्डेबल फोन
Comments (0)
Add Comment