भारतीय रेल्वे मध्ये सहाय्यक लोको पायलट पदांसाठी भरती; ५ हजारांहून अधिक जागांसाठी महाभरती

Indian Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वे मध्ये लोको पायलट पदांच्या तब्बल ५ हजार ६९६ जागाकरिता ही महाभरती प्रक्रिया पार पडणार आहे. सदर पदांकरीता आवश्यक पात्रता असणार्‍या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये, ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या भरतीमधील पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, मिळणारा पगार आणि या भरती अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

पद भरतीचा तपशील :

भारतीय रेल्वेमधील या महाभरती अंतर्गत सहाय्यक लोको पायलट पदांच्या एकुण ५,६९६ जागांसाठी ही महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत. त्याचबरोबर, SSLC plus आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

मिळणार एवढा पगार :

सदर पदांकरीता सातव्या वेतन आयोगानुसार १९,९०० रुपये बेसिक प्रमाणे मुळ वेतन + महागाई भत्ता देण्यात येतील .

वयोमर्यादा :

सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे तर कमाल वय ३० वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत. राखीव प्रवर्गांकरीता वयांमध्ये ०५ तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये ०३ वर्षांची सुट देण्यात येईल.

अर्ज शुल्काविषयी :

जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://indianrailways.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक २० जानेवारी २०२४ पासुन ते दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सादर करायचे आहेत .

Source link

central railway jobcentral railway recruitmentindian railway loco pilot jobsindian railway recruitmentindian railway recruitment 2024indian railway recruitment for loco pilotrailway job newsrailway recruitmentrailway recruitment notificationरेल्वे भरती
Comments (0)
Add Comment