बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; ऑफलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात

BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी ७५ रिक्त जागांवर पुन्हा नवीन भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने सादर करायचे आहेत.या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही.

पदभरतीचा तपशील :

भरले जाणारे पद : कनिष्ठ वकील
एकूण रिक्त पदे : ७५ जागा

यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून उमेदवारांनी खालील पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
या पत्त्यावर पाठवा अर्ज :

विधी अधिकारी, विधी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई : ४०० ००१

उमेदवारांनी वरील पत्त्यावर १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया कनिष्ठ वकील या पदाकरिता होणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता ही एल.एल.बी. असणे आवश्यक आहे तसेच उमेदवाराला तीन ते पाच वर्षाचा अनुभव गरजेचे आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :

उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर १६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सादर करायचे आहेत.
उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
भरतीचे इतर सर्व अधिकार Brihanmumbai Mahanagarpalika कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

महत्त्वाच्या लिंक्स :

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीमधील अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

bmc bharti 2023bmc recruitment 2023BMC Recruitment 2024brihanmumbai municipal corporationmumbai mahangarpalika bharti 2024बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३मुंबई महानगरपालिका भरतीमुंबई महापालिका भरती २०२३
Comments (0)
Add Comment